Railway Fare Discount : रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज, सर्व रेल्वे गाड्यांच्या या श्रेणीच्या भाड्यात मिळणार इतकी सवलत

| Updated on: Jul 09, 2023 | 1:06 PM

रेल्वेने कालपरवाच वंदेभारत ट्रेनच्या भाड्यात सूट होणार असल्याचे जाहीर केले होते. परंतू आता रेल्वे मंत्रालयाने वंदेभारत एक्सप्रेससह सर्वच रेल्वे गाड्यांच्या या श्रेणीत सुट जाहीर केली आहे.

Railway Fare Discount : रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज, सर्व रेल्वे गाड्यांच्या या श्रेणीच्या भाड्यात मिळणार इतकी सवलत
Vistadome COACH
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई : रेल्वे मंत्रालयाने रेल्वे प्रवाशांसाठी एक चांगली बातमी दिली आहे. सर्व प्रकारच्या रेल्वे गाड्यांच्या एसी चेअर कार ( Ac Chair Car ) आणि एक्झुकेटीव्ह क्लास ( Executive Class ) तसेच अनुभूती ( Anubhuti ) आणि विस्टाडोम ( Vistadome ) क्लासच्या तिकीटाचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेच्या बेसिक भाड्यात आता कमाल 25 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. इतर चार्जेस मात्र स्वतंत्रपणे आकारले जातील असे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे रेल्वेचा वातानुकूलीत आरामदायी प्रवास स्वस्त होणार आहे. परंतू या सवलतीसाठी गाड्यांच्या पात्रतेसाठी काही अटी लादण्यात आल्या आहेत. काय आहेत त्या अटी पाहूयात….

रेल्वेने कालपरवाच वंदेभारत ट्रेनच्या भाड्यात सूट होणार असल्याचे जाहीर केले होते. परंतू आता रेल्वे मंत्रालयाने वंदेभारत एक्सप्रेससह सर्वच रेल्वे गाड्यांच्या आरामदायी एसी चेअर कार आणि एक्झुकेटीव्ह क्लासच्या  भाड्यातील बेसिक फेअरमध्ये सूट जाहीर केली आहे. एखाद्या ट्रेनमध्ये जर ठराविक क्लाससाठी फ्लेक्सी फेअर ( डायनामिक फेअर ) योजना लागू असेल आणि प्रवाशांचे भारमान कमी असेल तर तात्पुरती ही फ्लेक्सी फेअर योजना रद्द होऊन प्रवासी वाढविण्यासाठी ही सवलत लागू करण्यात येईल असेही रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. ही भाडे सवलत स्पेशल ट्रेन किंवा हॉलिडे किंवा सणासुदीसाठी जाहीर केलेल्या विशेष ट्रेन लागू करण्यात येणार नाही.

या गटाला ही योजना लागू होणार नाही

या सवलतीचा रेल्वे पास, सवलत व्हाऊचर्स, आमदार, माजी आमदार कुपन्स, वॉरंट, खासदार, माजी खासदार, स्वातंत्र्य सैनिक आदींना फायदा देऊ नये त्यांच्याकडून नियमित क्लासवाईज भाडे आकारले जाणार आहे. अशा एण्ड टू एण्ड डीस्काऊंट दिले असेल तर अशा ट्रेनना तत्काल कोटा लागू करु नये प्रवासासाठी, जर पार्टली डीस्काऊट जाहीर केले असेल तर डीस्काऊंट जाहीर न केलेल्या सेक्शनमधील तत्काल कोटा जाहीर करावा असे रेल्वेने स्पष्ट केले आहे.

 खालील ट्रेनना मिळणार सूट

ज्या ट्रेनमध्ये गेल्या 30 दिवस 50 टक्क्यांहून कमी भारमान असेल ( एण्ड टू एण्ड किंवा काही ठराविक सेक्शन किंवा भागात ) अशाच गाड्यांचा या सवलतीसाठी विचार केला जाईल. अशा वेळी सवलतीचा दर त्या मार्गावरील इतर पर्यायी वाहतूक साधनांचे भाडे पाहून रेल्वेच्या सवलतीचा दर निश्चित केला जाईल. वातानुकूलित चेअर कार आणि एक्झुकेटिव्ह दर्जाच्या श्रेणीला ही सवलत तातडीच्या प्रभावाने लागू करण्यात आली आहे.