भारतीय रेल्वेचे नेटवर्क जगात चौथ्या क्रमांकाचे आहे. भारतीय रेल्वेतून दररोज अडीच लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करीत असतात. रेल्वेचा प्रवास सर्वात स्वस्त असल्याने भारतीयांना लांबपल्ल्याचा प्रवास रेल्वे गाड्यांतूनच करणे परवडत आहे. त्यामुळे अनेक जण तिकीट कन्फर्म होण्याची वाट पाहात असतात. परंतू जेव्हा जास्त मागणी असेत आणि गाड्यांची कमतरता असते. त्यावेळी प्रवाशांच्या हाती भलीमोठी वेटींगची लिस्ट हाती पडते. त्यामुळे हे वेटींग लीस्टचे तिकीट असतानाही प्रवासी ट्रेनमधून प्रवास करीत असतात, परंतू आता अशा वेटींग तिकीटवाल्या प्रवाशांवर कारवाई करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.
रेल्वेच्या लांबपल्ल्यांच्या गाड्यांमधील उन्हाळी हंगामातील गर्दीचे व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. तिकीट कन्फर्म न होताही काही प्रवासी लांबपल्ल्यांचा ट्रेनमधून प्रवास करतात. त्यानंतर टीसीकडून तिकीट बनवून प्रवास करीत असतात. रेल्वेला त्यामुळे इन्कम मिळते, परंतू रेल्वेच्या आरक्षित प्रवाशांना त्यामुळे अडचण निर्माण होत असते. त्यामुळे रेल्वे प्रशासनावर टीका होऊ लागली आहे. त्यामुळे अशा वेटींग तिकीटावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ट्रेनमधून उतरविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.
अत्यावश्यक कामानिमित्त बाहेर गावी जाण्यासाठी काही प्रवासी तिकीट कन्फर्म झाले नाही तरी त्याच तिकीटावर ट्रेनमध्ये चढतात आणि बिनधास्त दंड भरण्याची तयारी ठेवतात. तिकीट तपासनीस आलाच तर जेथून बसले आणि जेथे जाणार त्या स्थानकाचे भाडे आणि दंड भरणे देखील अशा प्रवाशांना सहज परवडते. तसे प्रवासी गाड्यांमध्ये गर्दी करु लागले आहेत. त्यामुळे अनेकदा आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांना बसायला जागा नाही अशी परिस्थिती ओढावू लागली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने आता निर्णय घेतला आहे.
प्रतीक्षा यादीतील तिकिटावर रेल्वेगाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमुळे आरक्षित तिकीटधारक प्रवाशांची प्रचंड होत असलेली गैरसोय पाहाता आता मध्य रेल्वेने निर्णय घेतला आहे. याबाबत अनेक प्रवाशांनी समाजमाध्यमावर तक्रारी केल्यानंतर मध्य रेल्वेने विना-आरक्षित प्रवाशांना रेल्वेगाडीतून उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. आरक्षित तिकीट नसलेल्या सुमारे 1,628 प्रवाशांना गुरुवारी लांबपल्ल्याच्या ट्रेनमधून खाली उत्तरविण्यात आल्याची माहीती मध्य रेल्वेने दिली आहे.आरक्षित तिकीटधारकांच्या तक्रारी वाढल्याने मध्य रेल्वेने ऑनलाइन आणि पीआरएस तिकीट खिडकीवरून काढलेल्या प्रतीक्षा यादीतील तिकीटांआधारे प्रवास करण्यास प्रवाशांना मनाई केली आहे.