दिल्ली : भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी आरामदायी निवासाची व्यवस्था प्रत्येक मोठ्या टर्मिनसवर केली आहे. लोकांना कमी पैशात रहाता यावे यासाठी रेल्वेने विश्रांतीसाठी रुम ( Retiring Room Irctc ) तयार केल्या आहेत. रेल्वे उन्हाळी सुट्ट्या आणि सणासुदीसाठी विशेष ट्रेन सोडत असते. तसेच आयआरसीटीसी ( Irctc Website ) वेबसाईटवर तिकीट बुकींग ( Ticket Booking ) करताना प्रवाशांना त्यांच्या निवासासाठी रुम देखील बुक करता येतात. खाजगी हॉटेलात रहाण्यापेक्षा रेल्वेच्या रिटायरिंग रुममध्ये रहाणे केव्हाही सुरक्षित आणि आपल्या बजेटमध्ये असते. तर पाहुया या सुविधेचा लाभ कसा घ्यायचा ते…
मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी टर्मिनसवर आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल टर्मिनसवर आयआरसीटीसीच्या मदतीने रेल्वेने अलिकडेच पॉड्स हॉटेलची सुविधा सुरु केली आहे. येथे तुम्हाला कमी किंमतीत रुम मिळू शकते. अवघ्या शंभर रुपये ते सातशे रुपयांत विविध तासांसाठी रुम मिळू शकते. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही तुमचे तिकीट किंवा आधारकार्ड दाखवून रुम बुक करु शकता.
मध्य रेल्वेने अलिकडेच कोकणात गणपतीसाठी 156 विशेष ट्रेनची घोषणा केली आहे. आता दिवा चिपळूण दरम्यान 36 मेमू आणि मुंबई आणि मंगळुरु दरम्यान आणखी 16 स्पेशल ट्रेन अशा एकूण 208 विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहेत.