नव्या वर्षाचे जोरदार स्वागत, अबब…या हॉटेलात एका रात्रीचे भाडे १५ लाख रुपये…

| Updated on: Dec 24, 2024 | 9:19 PM

नववर्षाच्या स्वागतासाठी अख्खे जग तयारी करीत असतात. पंचतारांकित हॉटेलाचे एका रात्रीचे भाडे हे पंधरा लाखापर्यंत गेले आहे. चला तर पाहूयात इतके भाडे का आहे ते...

नव्या वर्षाचे जोरदार स्वागत, अबब...या हॉटेलात एका रात्रीचे भाडे १५ लाख रुपये...
Follow us on

देशात पर्यटनाचा व्यवसाय वाढत आहे. भारतातील अनेक भागात परदेशी पर्यटकांची पावले सारखी वळत असतात. तेथील निसर्ग सौदर्याने हे लोक आकर्षित होत असतात.राजस्थान त्यापैकी एक आहे. येथे राजस्थानचे राजवाडे पाहाण्यासाठी तसेच येथील शहर पाहण्यासाठी पर्यटकांची कायम ओढा असतो. राजस्थानच्या अनेक शहरात लक्झरी हॉटेल्स आहेत. त्यांचे भाडे लाख रुपयांपर्यंत आहे. ३१ डिसेंबरच्या सायंकाळी आणि एक जानेवारी रोजी येथी भाडे आणखीन वाढले आहे.येथे एक हॉटेल असे आहे की जेथे रात्रभर राहण्यासाठी १५ लाख रुपये मोजावे लागत आहेत.

आम्ही राजस्थानच्या जयपूर येथील हॉटेल राज पॅलेसबद्दल ( Raj Palace ) बोलत आहोत. या हॉटेलच्या महागड्या रुमचे भाडे १७,७०० डॉलर ( सुमारे १५,०८,२४६ रुपये ) इतके प्रचंड आहे.या प्रेसिडेन्शियल सुट आहे. जो १६०० चौरस फूटावर पसरला आहे.यात चर डबल बेड एरिया आहे. अनेक लक्झरी सुविधा आहेत. स्वतंत्र शॉवर ,बाथटब, एसी, वायफाय, डेस्क किंवा वर्कप्लेस, कॉफी किंवा टीमेकर, टॅरेस, लाईट मेकअप मिरर सारख्या वस्तू दिल्या जात आहेत.

हे सुद्धा वाचा

या सुटची काय खासियत ?

राज पॅलेस हॉटेलच्या या प्रेसिडेन्सिएल सुटमध्ये सुख-सुविधांचा सर्व बंदोबस्त केलेला आहे. या सुटमध्ये उतरणाऱ्याला प्रत्येक छोटी ते मोठी वस्तू प्रदान केली जाते. यात रिमोट कंट्रोल टेलिव्हीजन, सॅटेलाईट टीव्ही, स्मोर डिटेक्टर, फोन इन बाथरुम, DVD प्‍लेअर, मिनी बार, स्पीकर फोन, टु लाईन फोन, फॅक्स मशिन अशा सुख सुविधांचा लटलूट येथे आहे.

चार मजल्यांचे अपार्टमेंट

प्रेसिडेंशियस सुट चार मजल्याचे अपार्टमेंट आहे. ज्यात चारबाग, विजय गलियारे द्वारे एक खाजगी एंट्री गेट आहे. एक प्रायव्हेट लिफ्ट आहे. जी सर्व चार मजल्यांशी जोडलेली आहे. या सर्वांचे संपूर्ण क्षेत्रफळ १६,००० चौरस फूट आहे. यात चार बेडरुम आहेत. ज्यात शहरातील नयनरम्य दृश्यासह एक छत आणि एक जकूजी आहे.

कोणत्या वस्तू मोफत मिळणार

बुकींग केल्यानंतर तुम्हाला यात ब्रेकफास्ट मोफत दिला जातो. सोबत वायफाय, फ्रुट बकेट, वेलकम ड्रींक, न्यूज पेपर, पाणी, स्विमिंग पूल आणि जिम सारख्या सुविधांसाठी कोणताही चार्ज लावला जाणार नाही.

का महाग आहे भाडे?

राज पॅलेसचा भारतातील लक्झरी हॉटेलात समावेश होता. ज्याच्या रुमचे इंटेरियर एखाद्या महालाला लाजवेल असे आहे. येथे राहणाऱ्या राजा- महाराजांसारखे सुख-सुविधा दिल्या जातात. या हॉटेलात ५० हजार ते १५ लाख रुपयांपर्यंत एका रात्रीचे भाडे आहे. नवीन वर्षांच्या निमित्त ३१ डिसेंबरला हे भाडे देखील वाढणार आहे. राजस्थानातील द ओबेराय राजविलास सारख्या हॉटेलात एका रात्री थांबण्याचे भाडे १ लाख १८ हजार रुपये आहे. जोधपूरच्या रॅडिसन हॉटेलातील एका रुमचे भाडे ३०,७११ रुपये आहे.