नवी दिल्ली – राज ठाकरेंच्या (Raj thackeray) अयोध्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या खासदार ब्रिजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांना वाढता पाठींबा पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशमधील मुस्लिम संघटनाच्या नेत्यांनी आज सकाळी बृजभूषण सिंह यांची भेट घेतली आहे. उत्तर प्रदेशात (UP) अशा पद्धतीचं हे पहिलं आंदोलन होत आहे. खासदारांच्या मुद्द्याला आमचा पाठींबा असल्याचं मुस्लिम नेत्यांनी दिलं पत्र आहे. जोपर्यंत राज ठाकरे माफी मागत नाही. तोपर्यंत राज ठाकरेंना अयोध्यात प्रवेश नाही अशी भूमिका ब्रिजभूषण सिंह यांनी जाहीर केली आहे. माझं कितीही नुकसान झालं तरी राज ठाकरेंना अयोध्यात येऊ देणार नाही. 5 तारखेला राज ठाकरेंना विरोध करण्यासाठी मुस्लिम नेते अयोध्यात येणार आहेत. राज ठाकरेंच्या उत्तरप्रदेश दौऱ्याला विरोध वाढला आहे.
उत्तर प्रदेशात हा मुद्दा चांगलाचं उचलून धरला आहे
ब्रिजभूषण शरणसिंग यांनी उत्तर प्रदेशात हा मुद्दा चांगलाचं उचलून धरला आहे. अयोध्येत आणि पूर्वांचलच्या जिल्ह्यांमध्ये फिरून राज ठाकरेंना थांबवायचे असेल तर लोकांनाही अयोध्येत आणता येईल, अशी तयारी त्यांनी 5 जूनला केली आहे. ब्रिजभूषण सिंह यांनीही अयोध्या चलोचा नारा दिला आहे. भाजपने सुरुवातीला ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विधानाला भाजपने हलकेच घेतले. पण आता हे प्रकरण मोठे होत चालले आहे. कारण कैसरगंजच्या खासदाराने या मुद्द्यावर भाजपपासून वेगळे राहून राजकारण करायचे जवळपास ठरवले असल्याचे दिसत आहे. काहीही झाले तरी राज ठाकरे यांच्यामुळे उत्तर प्रदेशातील राजकारण वेगळ्या वळणाला जाण्याची शक्यता आहे.
ब्रिजभूषण सिंह यांनी दोन दिवसांपूर्वी मोठी रॅली काढली होती
ब्रिजभूषण सिंह हे भाजप नेत्यांवर आतून नाराज आहेत, दुसरे म्हणजे भाजपमध्ये फारसे लक्ष न दिल्याने ब्रिजभूषण शरण सिंह यांना हा मुद्दा योग्य वाटत आहे. कारण या मुद्द्याद्वारे ते आपली नाराजी केंद्रीय नेतृत्वापर्यंत पोहोचवू शकतात. या मुद्द्यावर भाजपचे नेतृत्व त्यांच्या इतर अनेक मागण्यांपुढे नतमस्तक होऊ शकतात. ब्रिजभूषण सिंह यांनी दोन दिवसांपूर्वी मोठी रॅली काढली होती. त्यामध्ये भाजपचे अनेक कार्यकर्ते आणि साधू संत सहभागी झाले होते.