university : देशात राजस्थानात आहेत सर्वाधिक युनिवर्सिटी, महाराष्ट्राचा क्रमांक आहे कितवा ?

| Updated on: Feb 03, 2023 | 3:42 PM

उच्च शिक्षणासंदर्भात AISHE या संस्थेने केलेल्या अहवालानुसार देशात राजस्थानात सर्वाज जास्त ( 92 ) सर्वात कमी विद्यापीठे आहेत ( 2 ), त्यानंतर चंदीगड, गोवा आणि मिझोराममध्ये प्रत्येकी तीन विद्यापीठे आहेत.

university : देशात राजस्थानात आहेत सर्वाधिक युनिवर्सिटी, महाराष्ट्राचा क्रमांक आहे कितवा ?
univercity
Image Credit source: socialmedia
Follow us on

दिल्ली :  देशात राजस्थानात सर्वाधिक युनिव्हर्सिटी ( university ) आहेत. तर लडाख  (ladakh) या केंद्रशासित राज्यात सर्वात कमी युनिव्हर्सिटी आहेत. उच्च शिक्षणासंदर्भात AISHE या संस्थेचे एक सर्व्हेक्षण जाहीर करण्यात आले असून त्या देशातील उच्च शिक्षणाच्या सुविधांची यादी प्रसिद्ध झाली आहे. या पाहणीत सर्वाधिक कॉलेज ( college ) असलेल्या जिल्ह्यांची नावेही सादर करण्यात आली आहेत. तर चंदीगड, गोवा आणि मिझोरम या राज्यात त्यानंतर प्रत्येकी तीन विद्यापीठं असल्याचे अहवालात म्हटले आहे.

या पाहणी अहवालानूसार राजस्थान राज्यात सर्वाधिक 92 खाजगी विद्यापीठे, 26 स्टेट पब्लिक युनिव्हर्सिटी, 7 स्वायत्त विद्यापीठं, 5 महत्वाच्या राष्ट्रीय शिक्षणसंस्था ( आयआयटी, आयआयएम, एनआयटी ) आणि एक केंद्र आणि राज्य संचालित विद्यापीठ आहे.

उच्च शिक्षणाचा दर्जा तपासणाऱ्या या संस्थेने जारी केलेल्या अहवालात राजस्थान ( 92 ) पाठोपाठ अनुक्रमे उत्तर प्रदेश – 84, गुजरात – 83, मध्यप्रदेश – 74, कर्नाटक – 72 , महाराष्ट्र – 71, तामिळनाडू – 59, पश्चिम बंगाल – 52 अशी विद्यापीठांची संख्या आहे. तर सर्वाधिक कमी विद्यापीठामध्ये लडाखचा ( 2 ) समावेश होत आहे. तर चंदीगड, गोवा आणि मिझोरम या राज्यात त्यानंतर प्रत्येकी तीन विद्यापीठं असल्याचे अहवालात म्हटले आहे.

या जिल्ह्यात आहेत सर्वाधिक महाविद्यालये 

याशिवाय देशभरातील जिल्ह्यांची पाहणी केली असता बंगळूरू जिल्ह्यात सर्वाधिक महाविद्यालये आहेत. त्यानंतर जयपूर आणि हैदराबाद जिल्ह्यांना महाविद्यालयांच्या संख्येबाबत दुसरे स्थान मिळाले आहे. ऑल इंडीया सर्व्हे ऑन हायर एज्युकेशन  (All India Survey on Higher Education) हे सर्व्हेक्षण केले आहे.

जिल्ह्यांची नावे आणि कॉलेजची संख्या

बंगळूरू शहर – 1058

जयपूर – 671

हैदराबाद – 488

पुणे – 466

प्रयागराज – 374

रंगारेड्डी – 345

भोपाळ – 327

नागपूर – 318

गाझीपूर – 316

सिकर – 308

अशी आहे दर एक लाख लोकसंख्ये मागे कॉलेजची संख्या 

उत्तर प्रदेशात एकूण 8114 महाविद्यालये आहेत. दर एक लाख लोकसंख्ये मागे येथे 32 महाविद्यालये आहेत. महाराष्ट्राचा याबाबत दुसरा क्रमांक असून महाराष्ट्रात 4532 महाविद्यालये आहेत आणि दर एक लाख लोकसंख्ये मागे येथे 34 महाविद्यालये आहेत.

कर्नाटक तिसऱ्या क्रमांकावर असून येथे 4233 महाविद्यालये असून दर एक लोकसंख्ये मागे येथे 62 महाविद्यालये आहेत. तर राजस्थानचा क्रमांक चौथा क्रमांक असून येथे 3694 महाविद्यालये आहेत. येथे दर एक लाख लोकसंख्ये मागे येथे 40 महाविद्यालये आहेत.