नवी दिल्लीः काँग्रेस अध्यक्षपदासाठी (Congress President) कोणीही निवडणूक लढवू शकतो पक्षाकडून जाहीर होताच, शशी थरुर, दिग्विजय सिंह आणि अशोक गेहलोतांची (Ashok Gehlot) नावं चर्चेत आली. त्यामध्ये अशोक गेहलोतांनी आघाडी मारत हे पद आपल्यालच कसं मिळेल यासाठी सोनिया गांधींपासून ते राहुल गांधापर्यंत जोरदार फिल्डींग लावली. मात्र राजस्थानमध्ये सुरू असलेल्या राजकीय पेचप्रसंगामुळेच अशोक गेहलोत आता काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर फेकले गेले आहेत.
मुकुल वासनिक, के.सी. वेणुगोपाल, मल्लिकार्जुन खरगे आणि दिग्विजय सिंह यांचे नाव आता अध्यक्षपदाच्या शर्यतीत सामील झाले असल्याने ही अध्यक्षपदाची निवडणूक आणखी चर्चेत आली आहे.
अशोक गेहलोत यांनी राजस्थान काँग्रेसमध्ये जो काही गोंधळ घातला होता, त्यामुळेच काँग्रेस वर्किंग कमिटीने अशोक गेहलोत यांना अध्यक्षपदाच्या शर्यतीतून वगळण्याची शिफारस सोनिया गांधींकडे करण्यात आली होती.
राजस्थानमध्ये सुरू असलेल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्यांनी सोनिया गांधींना मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडण्याचा सल्लाही दिला होता.
राजस्थानमध्ये सुरू असलेल्या राजकीय नाट्यामुळे काँग्रेस वर्किंग कमिटीचे काही सदस्य अशोक गेहलोत यांच्यावर तीव्र नाराज झाले होते.
राजस्थानात मुख्यमंत्र्यांशी एकनिष्ठ असलेल्या आमदारांनी राजीनामे देऊन काँग्रेस सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला गेल्याने सीडब्लूसीच्या सदस्यांनीही तसाच अहवाल हायकमांडला दिला होता.
राजस्थानातील काँग्रेसविषयी सांगताना एएनआयने सांगितले आहे की, काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्यांनी गेहलोत यांच्याविरोधात तक्रारही दाखल केली गेली आहे.
त्यांनी सोनिया गांधींनाही स्पष्ट सांगितले आहे की, “अशोक गेहलोत यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना पक्षाची जबाबदारी देणे चांगले होणार नाही. त्यामुळे त्यांच्या जागी दुसऱ्या व्यक्तीचा पुनर्विचार करावा असंही त्यांनी सांगितले आहे.
सोनिया गांधी यांनी गेल्या आठवड्यात गेहलोत आणि शशी थरूर यांना अध्यक्षपदासाठी कोणीही निवडणूक लढवू शकता असंही सांगितले होते.
त्यानंतर अध्यक्षपदाच्या शर्यतीत गहलोत यांचे नाव आघाडीवर होते, मात्र राजस्थानमध्ये गेहलोत गटाच्या 90 हून अधिक आमदारांनी मोर्चेबांधणी केली असल्याने काँग्रेस सदस्यांनी त्यांच्या या राजकारणाबद्दल नाराजी व्यक्ती केली होती.
राजस्थानातील आमदारांनी राजीनामे नाट्य घडवून आणल्यानेही काँग्रेसचे वरिष्ठ नेतेही नाराज झाले होते. त्यामुळे गेहलोत यांचे नाव अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाद झाले आहे.