नवी दिल्ली : अयोध्येत राम मंदिर बांधण्याच्या कामासाठी विश्व हिंदू परिषदेने (VHP) राम मंदिर निर्माण सहयोग अभियान (मदतीची मोहीम) सुरु केले आहे. या मोहिमेअंतर्गत विश्व हिंदू परिषदेने आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रपती कोविंद यांनी अयोध्येत भव्य मंदिर बांधण्यासाठी विश्व हिंदू परिषदेकडे 5 लाख 100 रुपयांचा धनादेश सोपवला आहे. आज विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष आलोक कुमार यांच्यासह अनेक हिंदू संघटनांचे नेते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेण्यासाठी राष्ट्रपतींच्या निवासस्थानी दाखल झाले होते. या भेटीदरम्यान कोविंद यांनी मंदिरासाठी 500100 रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. (Ram temple construction : President Ram Nath Kovind gave 5 lakh one hundred check)
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनीही राम मंदिर बांधण्यासाठी विश्व हिंदू परिषदेला एक लाख रुपयांची मदत केली आहे. मुख्यमंत्र्यांनी ही रक्कम विश्व हिंदू परिषदेचे (व्हीएचपी) राष्ट्रीय संघटनामंत्री विनायकराव देशमुख यांच्याकडे सुपूर्द केली. विश्व हिंदू परिषदेने (VHP) 15 जानेवारीपासून संपूर्ण देशभर राम मंदिराच्या निर्मितीसाठी मदतीची मोहीम सुरु केली आहे. हे अभियान 44 दिवस चालणार आहे, जे दोन टप्प्यांमध्ये पूर्ण होईल. याचा पहिला टप्प्या 15 जानेवारी ते 31 जानेवारीदरम्यान पार पडेल. या टप्प्यात केवळ त्याच लोकांना बोलवलं जाईल, जे बऱ्याच काळापासून विश्व हिंदू परिषदेची संबंधित आहेत किंवा जोडलेले आहेत.
या अभियानाचा दुसरा टप्पा 1 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी दरम्यान चालेल. या टप्प्यात विश्व हिंदू परिषद (व्हीएचपी) देशभरातील सर्व रामभक्तांपर्यंत पोहोचण्यासाठी वाड्या-वस्त्या, गल्ली-बोळांमध्ये फिरेल. जे लोक रामाची भक्ती करतात, रामाची पूजा करतात ते सर्वजण या टप्प्यामध्ये विश्व हिंदू परिषदेला राम मंदिराच्या बांधकामासाठी मदत करु शकतात.
नोव्हेंबर 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येतील दीर्घकाळ चाललेल्या हिंदू-मुस्लिम वादावर तोडगा काढताना निर्णय दिला होता, ज्यामध्ये राम जन्मभूमीचा मुद्दा न्यायालयाने सोडवला होता. तसेच संबंधित वादग्रस्त ठिकाणी राम जन्मभूमी असल्याची बाब सिद्ध झाली होती. तसेच मुस्लीम सामुदायाला बाबरी मशीद बांधण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी पाच एकर जमीन देण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे राम मंदिरासाठी तीन कोटी रुपये देणार
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जेव्हा अयोध्येत गेले होते, तेव्हा त्यांनी राम मंदिराला 3 कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. त्यापैकी एक कोटी रुपयांचे ट्रान्झॅक्शन झालं आहे, अशी माहिती काही दिवसांपूर्वी विहिंपकडून देण्यात आली आहे.
Larsen & Toubro कंपनी राम मंदिर बांधणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्या वर्षी 5 ऑगस्ट रोजी अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. लवकरच या मंदिराच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे. पुढील तीन वर्षांमध्ये मंदिराचे बांधकाम पूर्ण होईल, असा विश्वास विश्व हिंदू परिषदेने व्यक्त केला आहे. मंदिराचे बांधकाम लार्सन अँड ट्युबरो (Larsen & Toubro) कंपनी करणार असून Tata Consultancy ही कंपनी सल्लागार म्हणून काम पाहणार आहे.
संबंधित बातम्या
Ayodhya : राम मंदिर ट्रस्टला 200 किलो चांदीची देणगी, चांदीदान थांबवण्याची वेळ
Ayodhya Ram Mandir | राम मंदिराचं निर्माण हे भाजपचं स्वप्न : लालकृष्ण आडवाणी
(Ram temple construction : President Ram Nath Kovind gave 5 lakh one hundred check)