नवी दिल्ली : जम्मू काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर (Jammu Shrinagar National Highway) एक निर्माणाधीन बोगद्याचा काही भाग कोसळल्यानंतर सुरु करण्यात आलेलं बचावकार्य शनिवारी थांबवण्यात आलं. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मलब्याखालून 9 मृतदेह (Dead Bodies) काढण्यात आले आहेत. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांची संख्या 10 वर पोहोचली आहे. दोन दिवसांपूर्वी या राष्ट्रीय महामार्गावरील बोगद्याचा काही भाग कोसळला होता. त्यामुळे काम करत असलेले काही मजूर त्यात अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी तातडीने बचावकार्याला (Rescue work) सुरुवात करण्यात आली. दोन दिवसानंतर जेव्हा हे बचावकार्य थांबवण्यात आलं. त्यावेळी 10 मृतदेह मिळाल्याची माहिती रामबन उपजिल्हाधिकारी मुसर्रत इस्लाम यांनी दिली.
#WATCH Rescue operation underway at tunnel collapse site on Jammu–Srinagar National Highway in the Makerkote area of Ramban, Jammu where a part of under-construction tunnel collapsed late last night
As per Ramban DC, a body was recovered while 9 are still trapped in the debris pic.twitter.com/1P11K72ImD
— ANI (@ANI) May 20, 2022
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व 10 मृतांच्या नातेवाईकांना दुर्घटनेची माहिती देण्यात आली आहे. 10 मृतांपैकी 5 जण पश्चिम बंगालचे असल्याची माहिती मिळतेय. तर आसामचा एकजण, नेपाळचे 2 तर दोघे स्थानिक रहिवासी होते. मृतदेह बाहेर काढल्यानंतर ते रुग्णालयात नेण्यात आले. निष्काळजीपणाचा ठपका ठेवत एफआयआर दाखल करण्यात आलाय. सर्व बेपत्ता मजुरांचे मृतदेह मिळाल्यानंतर शनिवारी दुपारी बचावकार्य थांबवण्यात आलं. दुर्घटना घडल्यानंतर तातडीने गुरुवार आणि शुक्रवारी दिवसरात्र बचावकार्य सुरु होतं. त्यात तीन लोकांना सुखरुपणे बाहेर काढण्यात यश आलं आहे.
#WATCH Rescue operation underway at Jammu tunnel collapse site, at Khooni Nala on Jammu–Srinagar National Highway in the Makerkote area of Ramban
Locals gathered in the area demand fast action as 10 labourers are feared trapped under the debris pic.twitter.com/wnef2XoZt3
— ANI (@ANI) May 20, 2022
यापूर्वी अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की, रामबन जिल्ह्याच्या खूनी नाला इथं निर्माणाधीन बोगद्याचं काम सुरु होतं. त्यादरमान बोगद्याचा काही भाग कोसळला. मात्र, शनिवारी रामबनचउ उपायुक्त मुसर्रत इस्लाम यांनी नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाच्या हवाल्याने सांगितलं की काम सुरु असलेल्या भागात T4 पर्यंत भूस्खलन झालं.
बचावकार्यात इंडो-तिबेट पोलीस सहभागी झाले होते. 15 व्या बटालियन ITBP चे जवान एका स्निफर डॉगसह बचावकार्यात सहभागी झाले होते. या दुर्घटनेत मनुष्यहानीसह बुलडोझर आणि अन्य वाहनांचंही मोठं नुकसान झाल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.