नवी दिल्ली : गोस्वामी तुलसीदास यांच्या श्री राम चरित मानसचे (Ramcharitmanas) गारुड उत्तर भारतावरच नाही तर संपूर्ण देशावर आहे. उत्तर भारतातील उत्तर प्रदेश, बिहारमध्ये रामचरित मानसवरुन राजकीय वादंग झाले. अनेक दिवस रामचरितमानसच्या काही ओव्यांचा आधार घेत हा वाद घालण्यात आला. पण आता रामचरितमानसच्या आधारे एक जागतिक विक्रम करण्यात आला आहे. आता रामचरितमानसचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness Book Of World Record) नोंदवले गेले आहे. वाराणशीचे डॉ. जगदीश पिल्लई यांच्या विशेष प्रयत्नाने रामचरितमानस हे जागतिक पटलावर पोहचले आहे. गिनीज बुक 15 व्या शतकात गोस्वामी तुलसीदास महाराजांनी श्री राम चरित मानस रचले आणि तेव्हापासून त्याचे गारुड भारतीय जनमानसावर आरुढ झाले आहे. सोप्या शब्दांचा ठाव हे या महाकाव्याचे वैशिष्ट्ये आहे.
काय आहे वर्ल्ड रेकॉर्ड
डॉक्टर पिल्लई यांनी रामचरितमानस हे सुगम काव्य 138 तास 41 मिनिटे आणि 2 सेकंद गायिले आणि जगातील सर्वात मोठे गाने म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याची नोंद झाली. त्यामुळे रामचरितमानस आता अधिकृतरित्या जगातील सर्वात मोठे गाने झाले आहे. इतके प्रदीर्घ गाणे अजून झालेले नाही.
असा तयार केला रेकॉर्ड
जगातील अनेक ऑडिओ चॅनलवर डॉ. पिल्लई यांनी रामचरितमानसचे गायन केले. पाच वर्षानंतर पाचव्यांदा त्यांना यश आले आणि डॉ. जगदीश पिल्लई यांचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदविल्या गेले. हे काम पूर्ण करण्यासाठी चार वर्षांची मेहनत घ्यावी लागली. यापूर्वी सर्वात मोठे गाणे गाण्याचा रेकॉर्ड अमेरिका आणि ब्रिटन येथील गायकांच्या नावे होता. आता हा बहुमान डॉ. पिल्लई यांच्या नावावर आहे.
नवीन धून केली तयार
गोस्वामी तुलसीदास यांनी रचलेल्या श्री रामचरितमानस या सुगम काव्यातील ओव्यांची डॉ. पिल्लई यांनी एक धून तयार केली. भजन आणि किर्तनाची त्यासाठी त्यांनी मदत घेतली. त्याआधारे 138 तास 41 मिनिटे आणि 2 सेकंदाचं मोठे गाणे तयार झाले. हे तुलसीकृत रामायण त्यांनी एप्पल म्युझिक, स्पॉटीफाई, अॅमेझॉन म्युझिक अशा प्लॅटफॉर्मवर पण प्रसारित केले आहे.
यापूर्वीचे गाणे कोणते
यापूर्वी जगातील सर्वात मोठे गाणे हे ब्रिटनच्या तरुणांच्या नावे होते. हे गाणे 115 तास 45 मिनिटांचे होते. 1 डिसेंबर 2021 रोजी हे गाणे तयार झाले. ब्रिटन येथील सेंट एल्ब्स येथे हा विश्व विक्रम झाला. मार्क क्रिस्टोफर आणि द पॉकेट गॉड्स या नावावर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नोंदविण्यात आला होता. हे एक प्रकारचे वाद्य काव्य होते. त्यानंतर मोठ्या कष्टाने डॉ. पिल्लई यांनी महाकाव्य जागतिक पलटावर आणले.