मुंबई : देशावर कोरोनाचं संकट घोंघावत असताना दुसरीकडे एलोपॅथी विरुद्ध आयुर्वेद असा संघर्ष पाहायला मिळत आहे. योगगुरु रामदेव बाबा यांनी एलोपॅथीवर टिप्पणी करताना एलोपॅथी हे एक मुर्खपणाचं विज्ञान असल्याचं रामदेव बाबा म्हणाले होते. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्याबाबत इंडियन मेडिकल असोसिएशन अर्थात IMA ने रामदेव बाबा यांच्यावर कारवाईची मागणी केली. सर्व स्तरातून टीका होऊ लागल्यावर रामदेव बाबा यांनी आपलं विधानही मागे घेतलं. मात्र, त्यानंतर लगेच त्यांनी एलोपॅथी आणि फार्मा कंपन्यांना 25 प्रश्न विचारत पुन्हा वाद ओढवून घेतला. (Ramdev Baba also underwent allopathy treatment in 2011)
रामदेव बाबा यांनी एलोपॅथीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं असलं तरी एकवेळ अशी होती की, रामदेव बाबा एलोपॅथीला शरण गेले होते. तसंच त्यांचे सहकारी आचार्य बालकृष्ण यांनाही AIIMS मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. UPA सरकारच्या काळात ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला होता. रामदेव बाबाही आण्णांच्या आंदोलनात सहभागी होत रामलीला मैदानावर उपोषणाला बसले होते. 4 जून 2011 रोजी तत्कालीन केंद्रीय मंत्री कपील सिब्बल यांनी दावा केला होता की, रामदेव बाबा यांची उपोषण संपवण्याबाबतची एक चिठ्ठी आपल्याला मिळाली आहे. रामदेव बाबा यांनी त्यांचा दावा खोडून काढला होता.
दिवसभर उपोषण केल्यानंतर रामदेव बाबा रात्री झोपेत असतानाच तिथे पोलिसांचा मोठा फौजफाटा पोहोचला. त्यानंतर एकच खळबळ माजली. काही वेळातच रामदेव बाबा स्टेजवर आले आणि तिथून अचानक उडी मारत पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. सलवार-कमीजमध्ये रामदेवबाबा नवी दिल्लीकडे निघाले असताना त्यांना पोलिसांनी पकडलं आणि देहरादूनला रवानगी केली. तिथेही रामदेव बाबा यांनी उपोषण सुरुच ठेवलं. त्यामुळे त्यांची प्रकृती ढासळली. त्यामुळे त्यांना देहरादूनच्या जॉलीग्रँट रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेव्हा त्यांचं वजन 5 किलोने घटलं होतं.
इतकंच नाही तर 23 ऑगस्ट 2019 रोजी आचार्य बालकृष्ण यांची प्रकृती अचानक बिघडली. तेव्हा ते बेशुद्ध होऊन पडल्याचं सांगण्यात आलं. त्यांना आनन-फानन मध्ये पतंजली योगपीठाजवळील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेव्हा काही टेस्ट करुन त्यांची रवानगी AIIMS मध्ये करण्यात आली होती. त्यावेळी अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं सांगण्यात आलं होतं.
रामदेव बाबा यांनी एका कार्यक्रमात अॅलोपॅथीवर टीका केली होती. आश्चर्यकारक तमाशा आहे. अॅलोपॅथी मूर्खपणाचं आणि दिवाळखोर विज्ञान आहे. आधी रेमडेसिवीर फेल ठरलं, नंतर अँटिबायोटिक्स फेल झालं, नंतर स्टेरॉईड फेल झाले, प्लाझ्मा थेरपीवरही बंदी घालण्यात आली, असं ते म्हणाले होते. तापावर दिलं जाणारं फॅबीफ्ल्यू देखील निकामी ठरलंय. जेवढे औषधं देत आहेत त्या सर्वांचं हेच होत आहे. त्यामुळे हा काय तमाशा सुरू आहे, असं जनता म्हणत आहे. त्यांची तापावरील कोणतीही औषधं काम करत नाहीये. कारण ते शरीराचं तापमान कमी करत आहेत. मात्र, ज्या विषाणूमुळे, बुरशीमुळे ताप येत आहे त्याचा यांच्याकडे इलाज नाही. तर मग हे कसे बरे करणार?, असा सवालही त्यांनी केला होता.
VIDEO: कोरोनाचा दुसरा डोस घेऊनही एक हजार डॉक्टर दगावले, हे कसले डॉक्टर?; रामदेव बाबांनी पुन्हा डिवचलेhttps://t.co/B6oKym1Uu9#RamdevBaba | #Ramdev | #Doctors | #CoronaSecondWave | #CoronaPandemic
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 25, 2021
संबंधित बातम्या :
रामदेव बाबांचा पुन्हा एकदा एलोपॅथीवर निशाणा, IMA आणि फार्मा कंपन्यांना योगगुरुंचे 25 प्रश्न
Ramdev Baba also underwent allopathy treatment in 2011