अयोध्येतील रामजन्मभूमीत प्रभू श्री रामाचे मंदिर निर्माण झाल्यानंतर आज पहिलीच रामनमवी आहे. या पहिल्या रामनमवीच्या दिवशी अयोध्येत मोठ्या संख्येने रामभक्तं दर्शनासाठी दाखल झालेत. अयोध्येतील शरयू नदी घाट, हनुमान गडी आणि राम मंदिर परीसर भाविकांनी फुलून गेले आहेत. अयोध्येतील ही संभाव्य गर्दी लक्षात घेता अयोध्या शहरात अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता इतर सर्व वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. अयोध्या शहराबाहेरच सर्व वाहने थांबवून सर्व भाविकांना चालतच मंदिरात दर्शनासाठी जावं लागत आहे. तसेच भाविकांची गर्दीचे नियोजन करण्यासाठी प्रशासनाने अतिरिक्त पोलिस तैनात केले आहेत.
२५ लाखांहून अधिक भाविक
आज राम नमवीच्या दिवशी २५ लाखांहून अधिक भाविक राम मंदिरात रामलल्लाचे दर्शन घेणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.भारतभूमीला जर खर्या अर्थाने कशाने जोडले असेल, तर ते म्हणजे सनातन संस़्कृतीने! या संस्कृतीची ओेळख म्हणजेच प्रभू श्रीराम होय.
प्रत्येक भारतीयाला आयुष्यात एकदा तरी अयोध्येला जाण्याची मनोमन इच्छा असते आणि हेच कारण आहे की प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येत रामभक्तांची रिघ लागली आहे.
रामनगरी फुलांनी सजली
थोड्याच वेळात सूर्य टिळा?
रामनवमीला आज दुपारी 12 वाजता रामलल्लाल सूर्य टिळा लावण्यात येणार आहे. हा काळ अभिजीत मुहूर्त असल्याचे सांगण्यात येते. वाल्मिकी रामायणानुसार त्रेतायुगात याचवेळी प्रभू श्रीरामाचा जन्म झाला होता. शास्त्रज्ञ रामलल्लाच्या डोक्यावर सूर्याची किरणे पोहचवण्याची व्यवस्था करतील. सूर्याची किरणे जवळपास 4 मिनिटांपर्यंत रामलल्लाच्या कपाळाची शोभा वाढवतील.