लोकल सुरू करण्याबाबत राज्य सरकारची रेल्वेशी चर्चा नाही?; दानवेंचा दावा काय?

| Updated on: Aug 09, 2021 | 10:21 AM

महाराष्ट्र सरकारने दोन डोस घेतलेल्यांना येत्या 15 ऑगस्टपासून लोकल प्रवास करण्यास मुभा दिली आहे. (Mumbai local train services to resume)

लोकल सुरू करण्याबाबत राज्य सरकारची रेल्वेशी चर्चा नाही?; दानवेंचा दावा काय?
raosaheb danve
Follow us on

नवी दिल्ली: महाराष्ट्र सरकारने दोन डोस घेतलेल्यांना येत्या 15 ऑगस्टपासून लोकल प्रवास करण्यास मुभा दिली आहे. मात्र, हा निर्णय जाहीर करण्यापूर्वी राज्य सरकारने रेल्वे मंत्रालयाशी चर्चाच केली नसल्याचं उघड झालं आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी तसे सुतोवाचही केलं आहे. (raosaheb danve reaction on cm uddhav thackeray’s announcement of Mumbai local train services to resume)

रावसाहेब दानवे यांनी टीव्ही 9 मराठीशा संवाद साधताना हे स्पष्ट केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकलबाबत जो निर्णय घेतला आहे. त्याचं स्वागतच आहे. राज्य सरकारच्या सूचनेप्रमाणे येत्या 15 ऑगस्टपासून आम्ही काही प्रमाणात लोकल सुरू करू. कोरोनाची स्थितीही आता आटोक्यात आली आहे. पण निर्णय घेण्यापूर्वी राज्य सरकारने रेल्वेशी थोडी चर्चा केली असती तर बरं झालं असतं. पण तरीही सरकारच्या या निर्णयाला रेल्वे प्रतिसाद देईल, असं दानवे यांनी म्हटलं आहे.

राज्याने यंत्रणा उभारावी

रेल्वेची भूमिका स्पष्ट आहे. प्रवासी तपासून आत सोडण्यात येईल. आम्ही लोकल सुरू करण्यास सज्ज आहोत. मात्र, प्रवाशांचे प्रमाणपत्रं तपासण्यासाठी राज्य सरकारनेही स्वत:ची यंत्रणा उभी केली पाहिजे. ही राज्याचीही जबाबदारी आहे, असं ते म्हणाले. आमची कसली नाराजी नाही. उलट आम्ही खूश आहोत. ज्या अडचणी येतील त्या चर्चेतून सोडवता आल्या असत्या, असंही ते म्हणाले.

राजकीय अर्थ काढू नका

राज्यातील नेते भेटण्यासाठी आले आहेत. ही केवळ सदिच्छा भेट आहे. कोणताही संघटनात्मक बदल होणार नाही. कोणताही राजकीय अर्थ काढण्याचा प्रश्नच नाही. प्रत्येकाच्या घरी जातो तसंच ते माझ्या घरी येणार आहेत. त्यामुळे त्याचा राजकीय अर्थ काढू नका, असं आवाहन त्यांनी केलं. (raosaheb danve reaction on cm uddhav thackeray’s announcement of Mumbai local train services to resume)

 

संबंधित बातम्या:

Mumbai Local Train : सर्वसामान्य मुंबईकरांना दिलासा मिळणार; लोकल प्रवासाच्या निर्णयासह मुख्यमंत्र्यांचं महत्वाचं आवाहन, वाचा सविस्तर

राज्यातली मंदीर, प्रार्थना स्थळं कधी सुरु होणार? मुख्यमंत्र्यांकडून पहिल्यांदाच ठोस माहितीची घोषणा

‘पॉवरफुल्ल’ महिला राजकारणी, तीनवेळा आमदार, पण मंत्रीपद नाही; जाणून घ्या प्रणिती शिंदेंची राजकीय कारकिर्द

(raosaheb danve reaction on cm uddhav thackeray’s announcement of Mumbai local train services to resume)