मुंबई : प्रत्येक आई-वडिल आपल्या मुलीला स्वतःच्या जीवापेक्षाही जास्त सांभाळतात. स्वतःच्या मुलीला कधीच कसली कमी पडू देत नाहीत, स्वतःची जेवढी काळजी घेत नाही तेवढी तिची घेतात. तर आता असेच पाकिस्तानमधील काही आई-वडील आहेत ज्यांनी काळजीपोटी स्वतःच्या मुलींच्या कबरीलाच गेट बनवून घेतलं आहे. हे ऐकून तुम्हीही चक्रावून गेला असाल ना? पण होय ही घटना खरी या आई-वडीलांवर अशी वेळ का आली याबाबत आपण जाणून घेणार आहोत.
पाकिस्तानमधून एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. जे वाचून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल. पाकिस्तानमधील काही पालकांनी आपल्या मुलींच्या कबरींना कुलूप लावलं आहे. यामागचं कारण म्हणजे आपल्या मृत मुलींवर बलात्कार होऊ नये म्हणून या पालकांनी कबरीलाच गेट बनवून घेतलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानामध्ये मृत व्यक्तींसोबत लैंगिक संबंध ठेवण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. डेली टाईम्सच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानात दर दोन तासांनी एका महिलेवर बलात्कार झाल्याची प्रकरणे समोर येत आहेत. अशातच चक्क मृत मुलींवरील बलात्काराच्या घटनांनी सगळ्यांनाच हादरवून सोडलं आहे.
अशा घृणास्पद कृत्यांसाठी ‘द कर्स ऑफ गॉड, व्हाय आई लेफ्ट इस्लाम’ या पुस्तकाचे लेखक हरिस सुलतान यांनी कट्टरपंथी इस्लामी विचारसरणीला जबाबदार धरले आहे. याबाबत त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “पाकिस्तानने असा लैंगिकदृष्ट्या निराश समाज निर्माण केला आहे की, ज्यामुळे लोक आता त्यांच्या मुलींच्या कबरींना कुलूप लावत आहेत. जेणेकरून त्यांच्या मुलींवर बलात्कार होऊ नये. तसंच तुम्ही जेव्हा बुरख्याचा संबंध बलात्काराशी जोडता तेव्हा तो तुमच्या थडग्यापर्यंत तुमच्या मागे येतो.”
2011 मध्ये निजामाबाद येथे नेक्रोफिलिया (मृत व्यक्तींसोबत सेक्स) चे पहिले प्रकरण उघडकीस आले होते. या प्रकरणात कबरींचे रक्षण करणाऱ्या रिझवान नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली होती. पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, रिझवानने तब्बल 49 महिलांच्या मृतदेहांवर बलात्कार केल्याचे सांगितले होते.
मानवी हक्क आयोगाच्या अहवालानुसार, पाकिस्तानातील 40% पेक्षा जास्त स्त्रिया हिंसाचाराला बळी पडल्या आहेत. पण या प्रकरणी आतापर्यंत पाकिस्तान सरकारचे कोणतेही वक्तव्य समोर आलेले नाही. अशातच बलात्काराच्या वाढत्या घटना पाहता तेथील कुटुंबीयांनी कबरीला लोखंडी गेट लावून कुलूप लावले आहे.