दिब्रुगड, आसाम : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या उपस्थितीत आज आसाममध्ये 7 अत्याधुनिक कॅन्सर सेंटरचं उद्घाटन झालं. टाटा ट्रस्टच्या मॉडेलनुसार या रुग्णालयांची उभारणी करण्यात आले आहे. यावेळी टाटा ट्रस्टचे (Tata Trust) सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटाही (Ratan Tata) उपस्थित होते. त्यावेळी बोलताना रतन टाटा भावूक झाल्याचे पाहायला मिळालं. ‘आयुष्याची शेवटती वर्षे आता आरोग्यासाठी समर्पित करणार. आसामला असं राज्य बनवा जे सगळ्यांना ओळखेल आणि सगळे आसामला ओळखतील’, असं रतन टाटा म्हणाले. आपण हिंदीत बोलू न शकल्याबद्दलही त्यांनी सुरुवातीलाच उपस्थितांची माफी मागितली. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा, माजी केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवालही उपस्थित होते.
#WATCH Dibrugarh: “I dedicate my last years to health. Make Assam a state that recognizes & is recognized by all,”says industrialist Ratan Tata at an event where PM Modi will shortly be inaugurating 7 state-of-the-Art-Cancer-Centres & lay foundation stone for 7 new Cancer centres pic.twitter.com/LFbhjc6SA5
— ANI (@ANI) April 28, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही यावेळी टाटा ट्रस्टचे आभार मानले. केवळ आसाम नाही तर ईशान्य भारतासाठी कॅन्सर ही एक मोठी समस्या राहिली आहे. यामुळे सर्वाधिक प्रभावित आमचा गरीब आणि मध्यम वर्गीय परिवार होतो. कॅन्सरवरील उपचारांसाठी काही वर्षांपर्यंत इथल्या रुग्णांना मोठ्या मोठ्या शहरांमध्ये जावं लागायचं. त्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गियांवर मोठा आर्थिक ताण येत होता. गरीब आणि मध्यमवर्गियांची ही समस्या दूर करण्यासाठी 5 – 6 वर्षात पावलं टाकण्यात आली आहेत. त्यासाठी मी सर्वानंतर सोनोवाल, हेमंता सरमा आणि टाटा ट्रस्टचे आभार मानतो, असं मोदी म्हणाले.
Cancer hospitals in Assam will augment healthcare capacities in Northeast as well as South Asia. https://t.co/7STceLzUAO
— Narendra Modi (@narendramodi) April 28, 2022
पंतप्रधान पुढे म्हणाले की आमच्या सरकारने सात गोष्टींवर, आरोग्याच्या सप्तऋषींवर फोकस केलं आहे.
इतर बातम्या :