Video | हृदयनाथ मंगेशकरांबाबत मोदी धडधडीत खोटं बोलले? नोकरीवरून काढण्याच्या मुद्द्यावर राऊत म्हणतात की…

| Updated on: Feb 10, 2022 | 12:18 PM

शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, यांना छत्रपतींचं नाव घेण्याचा अधिकार नाही. मुंबई ओरबाडण्याचे प्रयत्न सुरूयत. अजूनही...शिवसेना नसती तर मुंबई महाराष्ट्राबाहेर गेली असती. मी कोर्टात बोलणारच आहे. काल संसदेत मुद्दाम बोललो नाही.

Video | हृदयनाथ मंगेशकरांबाबत मोदी धडधडीत खोटं बोलले? नोकरीवरून काढण्याच्या मुद्द्यावर राऊत म्हणतात की...
नरेंद्र मोदी, हृदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर.
Follow us on

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी दोन दिवस संसदेत जोरदार राजकीय बॅटींग करून विरोधकांना विशेषतः काँग्रेसला चित केले. काँग्रेस नसती तर…पर्यंत त्यांनी जोरदार टीका केली. यावेळी गृहमंत्री अमित शाह गालातल्या गालात हसत मोदींच्या भाषणाचा आस्वाद घेताना उभ्या देशाने पाहिले. आता त्याच मोदींना घेरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनंतर शिवसेनाही (Shiv Sena) सरसावली आहे. सुप्रिया सुळेंनी मोदींना महाराष्ट्राचा अपमान करू नये, असे आवाहन केले. त्यानंतर आता शिवसेनेचा किल्ला सांभाळणारे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी हृदयनाथ मंगेशकरांबाबत मोदी धडधडीत खोटं बोलत असल्याचे म्हणत रोखठोक प्रहार दिल्लीतच केलाय. इतकेच नाही तर मला जे काल बोलायचं होते ते मी बोललो. आता यापुढे जे बोलायचंय ते महाराष्ट्राच्या राजधानीत, मुंबईत बोलेन असा इशाराही दिलाय. त्यामुळे तो राज्यात येऊन काय फटाके फोडणार याची उत्सुकता लागली आहे.

मोदी काय म्हणाले होते?

लता मंगेशकर यांचे धाकटे बंधू पंडित हृदयनाथ मंगेशकर यांची गळचेपी करण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला, असा थेट आरोप मोदींनी केलाय. गोव्याचे सुपुत्र असलेल्या हृदयनाथ मंगेशकरांच्या देशभक्तीवर काँग्रेसने संशय घेतला. त्यांच्यावर केलेली कारवाई अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा घाला असल्याचे म्हणत मोदी म्हणाले होती की, लता मंगेशकरांच्या निधनानं देश दुःखी झालय. पण लता मंगेशकर यांचं कुटुंब हे गोव्यातील होतं. त्यांच्या परिवारासोबत कशाप्रकारे अन्याय करण्यात आला.. हे जाणून घ्या.. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना ऑल इंडियो रेडिओच्या नोकरीवरून काढून टाकण्यात आलं.. हृदयनाथ मंगेशकर यांनी देशभक्तीवर कविता रेडिओवर प्रस्तुत केली म्हणून त्यांना काढून टाकण्यात आलं होतं, असं हृदयनाथ मंगेशकर यांनी एका मुलाखतीत सांगितलंय. सावरकरांनी हृदयनाथ यांना सांगितलं होतं, की माझी कविता सादर करून तुला जेलमध्ये जायचंय का…तेव्हा हृदयनाथ यांनी त्यांच्या देशभक्तीपर कवितेचा चाल देत सादर केलं होतं.. यानंतर दहाच दिवसांच्या आत हृदयनाथ मंगेशकर यांना नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं होतं, असा दावा मोदींनी केलाय.

राऊतांचे प्रत्युत्तर काय?

मोदींच्या मंगेशकरांबाबतच्या वक्त्यव्याला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, हृदयनाथ मंगेशकरांविषयी जे सांगितलं…ते माझ्या आयुष्यात मला जेव्हापासून कळलं तेव्हापासून सांगतो की, ने मजसी नेला आकाशवाणीनेच मोठं केलंय, पण पंतप्रधानांना नमस्कार आहे. हृदयनाथ मंगेशकर यांना काढलं असेल, तर ते गाणं वाजवतील कशाला, असा सवाल करत रेकॉर्डमध्ये असं काही नाही, असा दावा राऊत यांनी केलाय.

महाराष्ट्र झुकणार नाही

राऊत म्हणाले की, कितीही प्रयत्न करा. खोटे पुरावे उभे करा, लोकांना धमकावा, सरकार पाडण्याच्या धमक्या द्या, पण शिवसेना आणि महाराष्ट्र हा अशा येड्यागबाळ्यांपुढे झुकणारा नाही. महाराष्ट्राचा बाणा आहे. कुणाला गुडघे टेकायचे असतील, कुणाला महाराष्ट्राची लाज काढायची असेल, महाराष्ट्राला सुपर स्प्रेडर कोरोना म्हणालात. महाराष्ट्राच्या नद्यांमध्ये, समुद्रामध्ये प्रेतं नाही पडली. आणि महाराष्ट्रात सुपर स्प्रेडर…? हे योग्य नाही.. ईडीच्या दबावापुढे महाराष्ट्र कधी झुकला नाही आणि झुकणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

मी कोर्टात बोलणारच…

राऊत म्हणाले की, यांना छत्रपतींचं नाव घेण्याचा अधिकार नाही. मुंबई ओरबाडण्याचे प्रयत्न सुरूयत. अजूनही…शिवसेना नसती तर मुंबई महाराष्ट्राबाहेर गेली असती. मी कोर्टात बोलणारच आहे. काल संसदेत मुद्दाम बोललो नाही. त्यांच्या आधी कुणी पंतप्रधान झाले नाही, होणार नाही… असं त्यांना वाटतंय. मुंबईचं महत्त्व कमी करण्याचे जे प्रयत्न सुरू आहेत. त्यावर प्रत्येकानं बाणेदारपणे बोललं पाहिजे. आम्ही ती नेऊ याची त्यांना भीती वाटते. यूपीत 15 लोकसभा जागा लढणार आहोत. इतही राज्यात लढणार आहोत. याची त्यांना भीती वाटते, म्हणून आमच्या मागे राक्षसी वृत्तीनं लागलेत. तसं वागलं जातं, पण राक्षसाचा वध होतो हे लक्षात घ्या, असा इशाराही त्यांनी दिला.

इतर बातम्याः

Kumar Vishvas Birth Day Special | सृजन का बीज हूँ, जाया हो नही सकता, 10 वर्ष राजकारण, हजारो वर्ष कविता!!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

Nashik | महापालिकेच्या कोषागार विभागात घोटाळा, नियमित भरण्यावरच डल्ला, नेमके प्रकरण काय?