सिल्कयारा सुरुंग, उत्तरकाशी, | 28 नोव्हेंबर 2023 : देशासह जगाचे लक्ष लागलेला तो क्षण लवकरच येऊन ठेपणार आहे. 41 मजूरांची बोगद्यातून सुखरुप सुटका होईल. उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील सिलक्यारा सुरुंग दुर्घटनेत 41 मजूर फसले आहेत. 13 नोव्हेंबर रोजी हा प्रकार समोर आला होता. गेल्या 15 दिवसांपासून या मजूरांना बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. आता हे मजूर काही तासातच बाहेर पडतील. त्यांना बाहेर पडल्यानंतर वैद्यकीय सेवा आणि अन्य सेवांचा जलद पुरविण्याची तजवीज करण्यात आली आहे. त्यासाठी चिनूक हे हेलिकॉप्टर पण तैनात ठेवण्यात आले आहे. गरज पडल्यास मजुरांना तात्काळ एअरलिफ्ट करुन हवाई मार्गाने रुग्णालयात नेण्यात येणार आहे.
Uttarakhand | Latest picture of Uttarkashi Tunnel rescue operation that is underway to rescue the 41 trapped workers pic.twitter.com/PSF7jWcXNo
हे सुद्धा वाचा— ANI (@ANI) November 28, 2023
व्हर्टिकल ड्रिलिंग
बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासाठी परदेशातील ऑगर ड्रिलिंगचा वापर करण्यात आला. पण त्यात अपयश आले. त्यानंतर व्हर्टिकल ड्रिलिंगचा प्रयोग करण्यात आला. सिल्कयारा बोगद्याच्या वरील टेकडीवर उभ्या ड्रिलिंगला सुरुवात करण्यात आली होती.
बांधकामाधीन बोगद्याचा भाग कोसळला
उत्तराखंडमध्ये चारधाम प्रकल्प सुरु आहे. त्यातंर्गत सिल्कयारा ते बारकोट या दरम्यान 5 किलोमीटरच्या बोगद्याचे बांधकाम सुरु आहे. बोगद्याचा काही भाग 12 नोव्हेंबर रोजी कोसळला होता. बोगद्याच्या सिल्कयारच्या दिशेकडील 60 मीटरचा भाग खचला होता. त्यात 41 मजूर अडकले. बोगदा बांधून तयार असलेल्या दोन किलोमीटर बोगद्यात ही माणसं अडकली. त्यांना अन्नासह जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला.