नाशिक : देशात सध्या मोठ्या प्रमाणावर धर्म, जाती आणि आजानच्या राजकारणावरून भेद केला जात आहे. हनुमान जयंती (Hanuman Jayanti) दिनी देशाची राजधानी दिल्लीतील जहांगीरपुरीमध्ये हिंसाचार (Jahangirpuri violence) झाला आणि त्याचे पडसाद अख्या देशात पहायला मिळत आहेत. महाराष्ट्रात सुरू झालेले भोंग्यावरचे राजकारण उत्तर प्रदेशनंतर मध्य प्रदेश, गुजरात, हरियाणा आणि उत्तराखंड येथेही परले. त्यानंतर जशाच तसे म्हणत जहांगीरपुरीमध्ये अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. यानंतर उत्तर प्रदेशचे बुलडोझर मॉडेल हे मध्य प्रदेश, गुजरात, दिल्ली, हरियाणा आणि उत्तराखंड येथे वापरण्यात येत आहे. येथे संशयाच्या आधारावर एखाद्याचे घर-दुकान पाडण्यासाठी किंवा राजकीय विरोधकांचा काटा काढण्यासाठी आता हे बुलडोझर मॉडेल (Bulldozer model) वापरले जात आहे. अशातच शिव-शाहु-फुले-आंबेडकरांच्या विचारावर चालणाऱ्या महाराष्ट्रात मात्र जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या घटना समोर येत आहेत. महाराष्ट्रातील नाशिकच्या होलीक्रॉस चर्चमध्ये मुस्लिम समाजातील लोकांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर नमाजचे पठण करण्यात आली. यामुळे सध्या राज्यात गोंधळाचे आणि धार्मिक ध्रुवीकरणाचे वातावरण असताना नाशिकमधून समतेचा नारा देण्यात आला आहे.
सध्या महाराष्ट्रात सुरू झालेले भोंग्यावरचे राजकारण हे देशात पसरले आहे. त्यातच भोंग्याचे राजकारण थेट बुलडोझर मॉडेलवर आले असून अतिक्रमण काढण्यासाठी ठराविक समाजाला टार्गेट केले जात असल्याची ओरड आहे. त्यातच बुलडोझर मॉडेल उत्तर प्रदेशमध्ये पुर्ण क्षमतेने वापरले जात असताना तो इतर राज्यांनाही आपलंस केलं आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, दिल्ली, हरियाणा आणि उत्तराखंडसह इतर राज्यात सध्या दोन समाजात दुही पहायला मिळत आहे. तर दोन समाज एकमेंकाच्या समोर येत आहेत. तसेच प्रशासनला समोरकरून राजकारणी एकाच समाजाला टार्गेट करून आपली पोळी भाजत आहेत.
यादरम्यान महाराष्ट्रातील नाशिकमध्ये मात्र समाजविघातक घटनांना आणि बातम्यांना दूर करण्याचे काम सुरू आहे. येथे दोन समाजातील लोकांना एकत्र आणण्यासाठी तिसरा समाज पुढे आला आहे. नाशिकमध्ये सामाजिक सलोखा राखण्यासाठी होलीक्रॉस चर्चमध्ये मुस्लिम समाजातील लोकांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपवास सोडल्यानंतर (इफ्तारीनंतर) मुस्लिम समाजातील लोकांनी नमाज अदा केली.
यावेळी येथे सर्व समाजातील धर्मगुरूंची व्यक्तीगत मत विचारात घेऊन इफ्तार पार्टीचे आयोजनाचा प्रस्ताव ठेवला होता अशी प्रतिक्रीया अजमल खान यांनी दिली. तसेच इथल्या चर्चमध्ये इफ्तार पार्टी आयोजित करण्याचेही ठरले होते. त्याप्रमाणे आम्ही ते आमंत्रण आनंदाने स्वीकारले. आणि तेथे नमाजही अदा केली असेही अजमल खान सांगितले.
Maharashtra | People offered namaz at Nashik’s Holy Cross Church
We sought the opinion of all religious leaders for Iftar party…They happily accepted our invitation. Father suggested that we arrange Iftar party here at the church.He also offered namaz with us: Ajmal Khan(21.4) pic.twitter.com/Zm0h9i6ruG
— ANI (@ANI) April 21, 2022