Remal Cyclone Update : 135 किलोमीटर प्रति तास वारे वाहणार… दोन राज्य वादळाच्या तडाख्यात; रेमल चक्रीवादळ झालं भयंकर आक्रमक

| Updated on: May 26, 2024 | 6:19 PM

चक्रीवादळ 'रेमल' सोमवारी रात्री पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या अनेक भागात त्यामुळे मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. अनेक भागात पावसाला सुरुवात झाली आहे. 'रेमल' चक्रीवादळामुळे कोलकाता विमानतळ 21 तासांसाठी बंद केला आहे. अनेक मेल-एक्सप्रेस रद्द केल्या आहेत.

Remal Cyclone Update : 135 किलोमीटर प्रति तास वारे वाहणार... दोन राज्य वादळाच्या तडाख्यात; रेमल चक्रीवादळ झालं भयंकर आक्रमक
Remal Cyclone Update
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

चक्रीवादळ ‘रेमल’ने ( Remal Cyclone ) जोर पकडला असून ते आज ( रविवारी ) पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. हवामान विभागाने बंगाल आणि ओडिशाच्या अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. अनेक भागात पावसाला सुरुवात देखील झाली आहे. ‘रेमल’ चक्रीवादळामुळे कोलकाता विमानतळ 21 तासांसाठी बंद करण्यात आला आहे. डझनभर ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. या वादळाचा लॅंड फॉल काही तासांत सुंदरबनच्या हल्दीबारी येथे होणार आहे. त्यामुळे ताशी 135 किमी वेगाने वारे वाहण्याची अंदाज वर्तविण्यात आला आहे. ओदिशा आणि प. बंगाल अशा दोन राज्यांना या वादळाचा फटका बसणार असल्याने आठ लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून सर्व आपात्कालिन यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.

येथे पाहा ट्वीट –

आठ लाख लोकांचे स्थलांतर

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे ‘रेमल’ चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. कोलकातामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, हे वादळ येत्या काही तासांत तीव्र चक्री वादळात रूपांतरित होईल आणि 26 मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर हे वादळ पोहोचेल. ‘रेमल’ चक्रीवादळामुळे कोलकाता विमानतळ 21 तासांसाठी बंद केला आहे. रविवारी दुपारी 12 ते सोमवारी सकाळी 9 वाजेपर्यंत कोलकाता विमानतळावरून सर्व विमान उड्डाणे रद्द केली आहेत. याशिवाय डझनभर मेल एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

हवामान संशोधकांचा इशारा –

ताशी 135 किलोमीटर वेगाचे वारे

हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ दत्ता यांनी सांगितले की, 26 मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ‘रेमल’ चक्रीवादळाचे रुपांतर तीव्र चक्रीवादळात होऊन बांगलादेश आणि आसपासच्या पश्चिम बंगाल किनारपट्टीवरून ते जाण्याची शक्यता आहे. या वेळी ताशी 110 ते 120 किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि त्यांचा वेग ताशी 135 किलोमीटर असेल. ‘रेमल’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफची टीम ठिकठिकाणी तैनात करण्यात आली आहे. आठ लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. मच्छीमार नौका आणि मच्छीमारांना सुरक्षित स्थळ नेण्यात आले आहे.

बंगाल-ओडिशात मुसळधार पावसाचा इशारा

पश्चिम बंगाल आणि उत्तर ओडिशाच्या किनारी जिल्ह्यांमध्ये ‘रेमल’ चक्रीवादळाच्या प्रभावान रविवारी सोसाट्याचे वारे वाहून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. काही भागात पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. ईशान्य भारतातील काही भागात 27-28 मे रोजी मुसळधार पाऊसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. जेव्हा चक्रीवादळ पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनारपट्टीच्या भागात पोहोचेल, तेव्हा 1.5 मीटरपर्यंतच्या लाटेमुळे सखल भागात पूर येण्याची शक्यता असते. मच्छिमारांनी सोमवार सकाळपर्यंत उत्तर बंगालच्या उपसागरातील समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे.