मुंबई : दोन हजार रुपयांची नोट आरबीआयने चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत ही नोट चलनात असणार आहे. त्यानंतर ही नोट चलनातून पूर्णपणे बाद होणार आहे. त्यामुळे नोटा बदलण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरु आहे. कारण दोन हजार रुपये ही काय छोटी रक्कम आहे. त्यामुळे ठराविक वेळेत नोट बदलणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही तुमच्याजवळ असलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा जून महिन्यात बदलण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आरबीआयच्या माहितीनुसार, जून महिन्यात बँक 12 दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे नोटा बदलण्यासाठी 12 दिवस सोडून इतर दिवसांची निवड करा.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वतीने बँकेच्या सुट्ट्याची यादी जाहीर केली जाते. प्रत्येक राज्यांच्या सणासुदीनुसार बँकांना सुट्ट्या जाहीर केल्या जातात. या यादीनुसार जून महिन्यात एकूण 12 दिवस बँका बंद असणार आहेत. आरबीआयच्या वेबसाईटनुसार, या सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये आहेत. तुम्ही तुमच्या राज्यानुसार सुट्ट्या पाहून बँकेत जाण्याची तयारी करा.
जून महिन्यात या दिवशी बँका असतील बंद
तुम्ही बँकेत जाण्याचा प्लान केला असेल तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवर तपासू शकता. https://rbi.org.in/Scripts/HolidayMatrixDisplay.aspx या लिंकवर जाऊन यादी तपासा. प्रत्येक महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांबाबत येथे माहिती दिलेली आहे.