आरजी कर मेडिकल कॉलेज तसेच रुग्णालयातील महिला डॉक्टरची बलात्कारातून निर्घृण हत्या झाल्याने देशात संताप व्यक्त होत आहे. हा चिंतेचा विषय आहे की ओपीडी ड्यूटीवर असूनही त्या दिवशी पहाटे तीन ते सकाळी दहा वाजेपर्यंत कोणीच माझ्या मुलीचा शोध घेतला नाही अला धक्कादायक आरोप या मृत डॉक्टराच्या वडीलांनी केला आहे.
माझी मुलगी त्या दिवशी सकाळी 8:10 वाजता ड्यूटीला निघाली होती. आणि शेवटचे रात्री 11:15 वाजता तिच्या आईशी ती मोबाईल फोनवरुन बोलली होती. सकाळी माझ्या पत्नीने माझ्या मुलीला कॉल करण्याचा प्रयत्न केला होता. परंतू तिचा फोन कोणी उचलत नव्हते. तोपर्यंत माझ्या मुलीचा मृत्यू झाला होता.परंतू चिंतेची गोष्ट म्हणजे पहाटे 3 ते सकाळी 10 वाजेपर्यंत माझ्या मुलीची कोणालाही कशी गरज पडली नाही. ती ऑन ड्यूटी असूनही तिला शोधण्याचा कोणीच कसा प्रयत्न केला नाही.
या भयंकर घटनेला एक आठवडा उलटला आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत केवळ एका व्यक्तीला अटक करण्यात आले आहे. या समयी या बलात्कार आणि हत्या प्रकरणाने देशात संताप व्यक्त होत आहे. देशभरातील निवासी डॉक्टर आणि नर्स आंदोलन करीत आहेत. या प्रकरणातील दोषींना लवकरात लवकर अटक आणि खटला उभारुन त्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी होत आहे.
या भयानक बलात्कार प्रकरणाचा निषेध करणाऱ्या सर्व आंदोलकांची बाजू पीडितेच्या वडीलांनी घेतली आहे.
पुढे म्हणाले की रस्त्यावर निदर्शनावर उतरलेले तरुण माझ्या मुलं आणि मुलीसारखे आहेत. आम्ही आमची मुलगी तर गमावली आहे. परंतू कोट्यवधी मुले आम्हाला पाठिंबा देत आमच्या सोबत उभे आहेत. तिला कॉलेजात काही समस्यांचा सामाना करावा लागला. संपूर्ण विभागच संशयास्पद होता. लोक निर्दशने करीत आहेत. आम्ही त्यांच्या बाजूने असल्याचे पीडीतेच्या वडीलांनी सांगितले.