पणजी: गेल्या काही काळापासून गोव्यात घटस्फोट घेणाऱ्या जोडप्यांची संख्या वाढल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर गोवा सरकारने आता राज्य पातळीवर विवाहपूर्व (Marriage) समूपदेशनासाठी यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. गोव्याचे विधिमंत्री निलेश कार्बल यांनी यासंदर्भातील घोषणा केली. (Rise in divorces Goa to start premarital counselling)
त्यासाठी आता विवाहासाठी जोडप्यांनी नोंदणी केल्यानंतर त्यांचा समूपदेशन केले जाईल. नोंदणी आणि प्रत्यक्ष विवाहाचा दिवस यामध्ये 15 दिवसांचा कालावधी असतो. याच काळात विवाहोच्छूक जोडप्यांचे समूपदेशन करण्याची योजना गोवा सरकारने आखली आहे. राज्यात लग्न मोडण्याची समस्या गंभीर आहे. अनेक नवविवाहीत जोडपी तीन ते चार महिन्यांत घटस्फोट घेत आहेत. वर्ष किंवा तीन वर्षात संसार तुटणाऱ्यांचेही प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे आम्ही याबाबत चिंतीत असल्याचे निलेश कार्बल यांनी सांगितले.
विवाह नोंदणी कार्यालयातील माहितीनुसार, गोव्यामध्ये सध्या 15 दिवसांत 10 ते 15 घटस्फोट होताना पाहायला मिळत आहेत. हे प्रमाण चिंता वाढवणारे आहे. त्यामुळे आमची जबाबदारी म्हणून आम्ही जोडप्यांचे समुपदेशन करणार आहोत.
जोडप्यांनी विवाहासाठी नोंदणी केल्यानंतर आम्ही त्यांना पती-पत्नीच्या जबाबदाऱ्या आणि नातेसंबंधाविषयी समजावून सांगू. एक पती, पत्नी किंवा पालक म्हणून काय करावे लागते, हे त्यांना सांगू. त्यासाठी आम्ही एक योजनाही आखली आहे. काही तास जोडप्यांचे समुपदेशन झाल्यानंतरच त्यांना विवाहाचे प्रमाणपत्र देण्यात येईल, असे निलेश कार्बल यांनी सांगितले.
संबंधित बातम्या :
पुरुषांना त्यांच्यापेक्षा वयानं मोठ्या महिला, पार्टनर, पत्नी म्हणून का आवडतात? वाचा ही 9 कारणं!
Relationship Tips | कामाच्या ताणामुळे जोडीदाराला वेळ देता येत नाहीय? मग, ‘असा’ करा टाईम मॅनेज!
प्रियंकाने शेअर केलं निकसोबतच्या ‘यशस्वी’ लग्नाचं गुपित, अशा प्रकारे ठेवतात एकमेकांना आनंदी!
(Rise in divorces Goa to start premarital counselling)