नवी दिल्ली : दोन रोमिओ हेलिकॉप्टर (Romeo Helicopter) भारतीय नौदलात (Indian Navy) सामील झाले आहेत. रोमियो नावावर हलक्यात घेऊ नका कारण हे रोमिओ सध्या भारताच्या दुष्मनांना धडकी भरवत आहेत. यांचं खरं नाव MH 60R मल्टी-रोल हेलिकॉप्टर (MH 60R Multi-Role Helicopter) आहे. त्याच्या नावातील आर हे रोमियोचे संक्षिप्त केलं आहे. असेच आता आणखी 21 हेलिकॉप्टर येणार आहेत. त्यांना येण्यासाठी आणखी तीन वर्षे लागतील. हे हेलिकॉप्टर भारतीय नौदलाच्या स्वदेशी विमानवाहू युद्धनौका IAC विक्रांतवर देखील तैनात केले जाऊ शकते. MH 60R मल्टी-रोल हेलिकॉप्टर अमेरिकेच्या Skorsky Aircraft कंपनीने बनवले आहे. रोमियो हेलिकॉप्टरचे एकूण पाच प्रकार आहेत. याशिवाय त्यांच्या निर्यातीच्या गुणवत्तेनुसार बदल केले जातात. त्यांचा वापर पाळत ठेवणे, हेरगिरी, व्हीआयपी मुव्हमेंट, हल्ला, पाणबुडी शोध यासाठी केला जाऊ शकतो. हे अनेक प्रकारच्या कामांसाठी वापरले जाऊ शकते.
The first tranche of #MH 60R helos were received by #IndianNavy at @KochiAirport with the traditional welcome ceremony.
Delivered by @usairforce Special Air Assignment Mission Flight, these add to the 3 delivered earlier in Jun 21 in #UnitedStates.@SpokespersonMoD pic.twitter.com/sTQ3LSxV0t— SpokespersonNavy (@indiannavy) July 28, 2022
रोमियो हेलिकॉप्टरवर डझनभर प्रकारचे सेन्सर आणि रडार बसवण्यात आले आहेत, जे शत्रूच्या प्रत्येक हल्ल्याची माहिती देतात. ते उडवण्यासाठी 3 ते 4 क्रू मेंबर्स लागतात. याशिवाय त्यात 5 जण बसू शकतात. त्याचे जास्तीत जास्त टेकऑफ वजन 10,433 किलो आहे. म्हणजेच संपूर्ण शस्त्रे आणि सैनिकांसह आकाशात झेप घेऊ शकतात. त्याची लांबी 64.8 फूट आहे. उंची 17.23 फूट आहे.
MH 60R मल्टी-रोल हेलिकॉप्टर दोन जनरल इलेक्ट्रिकच्या टर्बोशाफ्ट इंजिनद्वारे चालवले जात आहे. जे टेकऑफच्या वेळी 1410×2 kW ची पॉवर निर्माण करतात. त्याच्या मुख्य पंख्याचा व्यास 53.8 फूट आहे. हे हेलिकॉप्टर एकावेळी 830 किमी अंतर कापू शकते. जास्तीत जास्त 12 हजार फूट उंचीवर उड्डाण करू शकते.याचा सरळ वेग 1650 फूट प्रति मिनिट आहे. रोमियो हेलिकॉप्टर कमाल 270 किलोमीटर वेगाने उड्डाण करू शकते. पण गरज भासल्यास वेग ताशी 330 किलोमीटरपर्यंत वाढवता येईल. यात दोन मार्क 46 टॉर्पेडो किंवा MK 50 किंवा MK 54s टॉर्पेडो बसवले जाऊ शकतात. याशिवाय 4 ते 8 AGM-114 हेलफायर क्षेपणास्त्रे बसवता येतील.