ऑपरेशन ‘नन्हे फरिश्ते’ : RPF ने 7 वर्षात घर सोडून आलेल्या 84,119 मुलांना पालकांच्या स्वाधीन केले

| Updated on: Jul 17, 2024 | 8:01 PM

भारतीय रेल्वेच्या देशभरातील विविध डिव्हीजनमध्ये काळजी आणि सुरक्षेची गरज असलेल्या लहान मुलांसाठी रेल्वे सुरक्षा दल ‘नन्हे फरिश्ते’ मोहिम राबवित असते.

ऑपरेशन ‘नन्हे फरिश्ते’ : RPF ने 7 वर्षात घर सोडून आलेल्या 84,119 मुलांना पालकांच्या स्वाधीन केले
RPF OPERATION 'NANHE FARISHTE'
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

बईसारख्या स्वप्नांच्या शहरात कोणी रोजगारासाठी, कोणी चित्रपटात काम करण्यासाठी तर कोणी अन्य आमीषाला भुलून दररोज येत असतो. आई-वडीलांशी भांडण झाल्याने काही लहान मुले घर सोडून आर्थिक राजधानीत दाखल होत असतात.यातील काही मुलांना कोणीतरी फसवून देखील मुंबई, कोलकाता, बंगलुरु, नाशिक – पुण्यासारख्या महानगरात आणतं….काही कम नशीबी मुलं मुंबईसारख्या या मोहमयी मायावी नगरीत आपले बालपण हरवून बसतात तर काही वाईट मार्गाला लावली जातात.  काहींंना अपंग करुन भिक्षा देखील मागितली जाते. तर काहींना कुंटणखान्यात विकले  जाते. अशा घर सोडून आलेल्या मुला-मुलींना त्यांच्या पालकांच्या घरी पाठवणूक करण्याचे काम आरपीएफ म्हणजेच रेल्वे सुरक्षा बल नेहमी करीत असते. या मोहिमेला साजेशे नावही देण्यात आले असून या ऑपरेशन ‘नन्हे फरिश्ते’ मोहिमेंतर्गत गेल्या 7 वर्षात तब्बल घर सोडून आलेल्या 84,119 मुलांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे आणि या मुलांना पुन्हा त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले गेले आहे.

भारतीय रेल्वेच्या नेटवर्कने एकमेकांना जोडले जात असते. परंतू या रेल्वेतून अनेकदा आपल्या स्वप्नांचा पाठलाग करीत काही अजाणती मुले-मुली पालकांना न सांगता मुंबईसारख्या महानगरात दररोज दाखल होत असतात. या अशा मुलांना वेळीच ओळखून त्यांना मदत करण्याचे काम चाईल्ड हेल्पलाईन ही संस्था करत असते. या संस्थेच्या स्वयंसेवकाच्या मदत घेत रेल्वेच्या सुरक्षा बलाच्या महिला पोलिस देखील या मोहीमेत सहभागी होत असतात.ज्यावेळी आपल्या आई-वडीलांना ही मुले पुन्हा भेटतात त्यावेळी त्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा पुर वाहत असतो. तर पालकांच्या चेहऱ्यावर कृतज्ञतेचे भाव असतात. ते रेल्वेच्या सुरक्षा दलाचे आभार मानतात. रेल्वे सुरक्षा दल ( आरपीएफ ) गेली सात वर्षे ‘नन्हे फरिश्ते’ मोहीम प्रभावीपणे राबवित आहे.

या मोहीमेत गेल्या सात वर्षांत ( 2018-मे 2024 ) विविध रेल्वे स्थानके आणि रेल्वेच्या ट्रेनमधून एकूण संकटात सापडलेल्या एकूण 84,119 मुलांची सुटका करण्यात आली आहे. यात 3,430 मुले घरातून पळून आलेली होती. त्यात मुलीची संख्या 1,161 इतकी होती. साल 2018 हे वर्ष या मोहीमेसाठी अत्यंत महत्वाचे ठरले.या वर्षात आरपीएफने एकूण 17,112 मुले आणि मुलींची सुटका केली आहे. याच मुले आणि मुली अशा दोन्ही समाविष्ट होते. 2018 या वर्षाने रेल्वेला या अशा उपक्रमाची गरज किती जास्त आहे हे समजले. त्यामुळे या मोहिमेचा पाया अधिक भक्कमपणे रचला गेला. साल 2019 मध्ये 15,932 मुला-मुलींची सुटका करण्यात आली.

कोरोना साथीतील आव्हानं

कोविड  – 19 साथीमुळे 2020 हे वर्ष सर्वांसाठीच आव्हानात्मक ठरले, यावर्षी जागतिक साथीमुळे जनजीवन ठप्प झाले होते. रेल्वे मोहीमेच्या कामावर देखील या साथीचा लक्षणीय परिणाम झाला. तरीही या साथीच्या आव्हानांचा सामना करीत आरपीएफने यावर्षी 5,011 मुलांची सुटका केली. साल 2021 मध्ये आरपीएफने  11,907 मुलांची सुटका करीत त्यांचे काऊन्सिलींग करुन त्यांना त्यांच्या पालकांकडे सुखरुपपणे सोपविले.

साल 2022 मध्ये, आरपीएफने पुन्हा 17,756 मुलांची सुखरुप सुटका करीत त्यांना मनुष्य तस्करी, अंमलीपदार्थांचे रॅकेट या धोक्यांपासून सुटका केली. आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. यावर्षी घरातून भांडण करुन पळून आलेली आणि हरवलेली मुले मोठ्या संख्येने विविध झोनमध्ये रेल्वे गाडी आणि स्थानक परिसरात सापडली. त्यांना विश्वासात घेऊन बोलते केले गेले आणि आवश्यक ती काळजी आणि संरक्षण देण्यात आले. साल 2023 या वर्षात आरपीएफ ने 11,794 मुलांची सुटका केली आहे. यंदाच्या साल 2024 मे महिन्यांपर्यंत पहिल्या पाच महिन्यांत आतापर्यंत आरपीएफने 4,607 मुलांची सुटका केली आहे. यामध्ये घरातून पळून आलेल्या 3430 मुलांचा समावेश असून तर हरविलेल्या मुलांची संख्या 386 इतकी आहे.