नवी दिल्ली : भारताला मॅन्युफॅक्चरिंग हब बनवण्यासाठी आणि चीनबरोबर टक्कर देण्यासाठी केंद्र सरकारकडून गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न करण्यात येत आहे. त्याची सुरुवात Apple Inc च्या भारतात मोठ्या प्रमाणावर उत्पादनांच्या निर्मितीसह झाली आहे. त्यामुळे सरकार आता देशात स्वस्त लॅपटॉप, टॅब्लेट आणि कॉम्प्युटरसारखे इतर आयटी हार्डवेअर बनवण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. यामुळे देशातील 2 लाख लोकांना रोजगार मिळण्याची अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, आयटी हार्डवेअरसाठी पीएलआय योजनेअंतर्गत सरकार 17,हजार कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करणार आहे.
ही रक्कम पुढील 6 वर्षांत खर्च केली जाणार आहे. यामुळे देशातील सुमारे 75 हजार लोकांना प्रत्यक्ष रोजगार आणि सुमारे 2 लाख लोकांना अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे असंही आता केंद्रा सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
यासोबतच त्यांनी स्पष्ट केले आहे की, सरकारच्या या योजनेचा फायदा लॅपटॉप, टॅब्लेट आणि कॉम्प्युटर, सर्व्हर आणि इतर लहान आयटी हार्डवेअर उपकरणे बनवणाऱ्या कंपन्यांनाही त्याचा फायदा मिळणार आहे.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून आयटी क्षेत्राबद्दल माहिती देताना त्यांनी सांगितले की, देशात दरवर्षी लॅपटॉप, टॅब्लेट आणि कॉम्प्युटरचे उत्पादन प्रचंड वाढेल आहे.
त्यामुळे अशा प्रकारची उत्पादने 3.35 लाख कोटी रुपयांची तयार केली जात असल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात आले. त्याचबरोबर यासाठी एकूण 2 हजार 430 कोटी रुपयांची गुंतवणूकही येणार आहे.
केंद्र सरकारकडून एप्रिल 2020 मध्ये पीएलआय योजना सुरू करण्यात आली होती. आयटी हार्डवेअरसाठी पीएलआय योजना फेब्रुवारी 2021 मध्ये सुरू करण्यात आली होती.
त्यासाठी सरकारने 7 हजार 350 कोटी रुपयांची तरतूद केली होती. यानंतर हार्डवेअर उत्पादक कंपन्यांनी सरकारला वाटप वाढवण्याचीही विनंती केली होती.
केंद्र सरकारच्या या नव्या योजनेमुळे 2 लाख रोजगार निर्मिती होणार असल्याचे सांगत त्याचा फायदा युवावर्गाला होणार असल्याचे मत वैष्णव यानी व्यक्त केले.