RSS प्रमुख मोहन भागवत यांचे मोठे विधान; म्हणाले, 15 वर्षात भारत अखंड होईल

| Updated on: Apr 14, 2022 | 5:16 PM

हरिद्वार : RSS प्रमुख मोहन भागवत हे त्यांच्या स्पष्ट बोलण्यामुळे ओळखले जातात. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी अखंड भारताचा अजेंडा नेहमीच महत्त्वाचा राहिला आहे. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत (rss chief mohan bhagwat) यांनी अखंड भारताचा (India) मुद्दा धरत परत एकदा मोठे विधान केले आहे. त्यांनी यावेळी, सनातन धर्म (Sanatana Dharma) हाच हिंदू राष्ट्र (Hindu Rashtra) आहे. […]

RSS प्रमुख मोहन भागवत यांचे मोठे विधान; म्हणाले, 15 वर्षात भारत अखंड होईल
सरसंघचालक मोहन भागवत
Image Credit source: TV9
Follow us on

हरिद्वार : RSS प्रमुख मोहन भागवत हे त्यांच्या स्पष्ट बोलण्यामुळे ओळखले जातात. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी अखंड भारताचा अजेंडा नेहमीच महत्त्वाचा राहिला आहे. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत (rss chief mohan bhagwat) यांनी अखंड भारताचा (India) मुद्दा धरत परत एकदा मोठे विधान केले आहे. त्यांनी यावेळी, सनातन धर्म (Sanatana Dharma) हाच हिंदू राष्ट्र (Hindu Rashtra) आहे. असे म्हटले आहे. त्याचबरोबर त्यांनी पुढील 15 वर्षात भारत अखंड होईल. हे सर्व आपण आपल्या डोळ्यांनी पाहू असेही म्हटले आहे. एवढेच नाही तर संत आणि ज्योतिष्य यांच्या म्हणण्यानुसार 20ते 25वर्षांत भारत अखंड भारत होईलच, पण आपण सर्वांनी मिळून यासाठी प्रयत्न केले तर अखंड भारताचे हे स्वप्न पुढील 10ते 15 वर्षात साकार होईल, असेही भागवत म्हणाले.

RSS प्रमुख मोहन भागवत हे ब्रह्मलिन महामंडलेश्वर श्री 1008 स्वामी दिव्यानंद गिरी, प्राण प्रतिष्ठा आणि श्री गुरुत्रय मंदिराच्या मूर्तीचे उद्घाटन करण्यासाठी बुधवारी कंखलमधील सन्यास रोडवरील श्री कृष्ण निवास आणि पूर्णानंद आश्रमात पोहोचले होते. यावेळी ते म्हणाले की, भारत प्रगतीच्या मार्गावर सातत्याने पुढे जात आहे. जे त्याच्या मार्गात येतील त्यांचा नाश होईल. तसेच ते म्हणाले की, आम्ही फक्त अहिंसेबद्दल बोलू, पण हातात काठी घेऊन हे बोलू. आमच्या मनात द्वेष, वैर नाही, पण जगाचा विश्वास हा ताकद वर असेल तर आम्ही काय करणार?

राज्य बदलतो तसे राजा ही बदलतो

तसेच भागवत म्हणाले की, ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाच्या बोटाने गोवर्धन पर्वत उठला, मात्र त्याखाली आश्रय घेणाऱ्यांना वाठले की, गोवर्धन पर्वत त्यांच्या काठ्यांच्या आधारावर आहे. पण जेव्हा श्रीकृष्णाने आपल्या बोटाचे आधार काढला त्यावेळी गोवर्धन खाली येऊ लागला. तेव्हा आश्रय घेणाऱ्यांना खरे सत्य कळाले. त्याचप्रमाणे आपण सर्वजन काठ्यांच्या आधार बनू. तर संतांच्या आशीर्वादाने आणि स्वामी विवेकानंद महर्षी अरविंद यांच्या बोटाचे आधाराने भारत लवकरच पुन्हा अखंड भारत बनेल, असे सरसंघचालक म्हणाले. तसेच ते म्हणाले की सनातन धर्म आणि भारत हे एकच आहेच. पण जेव्हा राज्य बदलते तेव्हा राजाही बदलतो, असेही भागवत म्हणाले.

सनातन धर्म संपविणारे स्वत: संपले

तसेच भागवत म्हणाले की, 1000 वर्षांपासून सनातन धर्म संपविण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण ज्यांनी असा प्रयत्न केला ते स्वत: संपले. मात्र आम्ही आणि सनातन धर्म आजही येथेच आहे. तसेच त्यांनी, भारत एक असा देश आहे जिथे जगभरातून लोक येतात आणि त्यांच्यातील दृष्ट प्रवृत्ती येथे संपते. त्यामुळे भारतात होऊन चांगले व्हा अन्यथा संपा असेही असेही भागवत म्हणाले.

 

इतर बातम्या :

Ambedkar Jayanti 2022 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार , जे जगणं समृद्ध करतात

आंध्र प्रदेशातील फार्मा युनिटला लागलेल्या आगीत 6 जणांचा मृत्यू, 12 जखमी

सावधान! भारतात कोरोना वाढतोय, 1007 नव्या रुग्णांची वाढ