मुंबई : जमिनीला दुषित होण्यापासून वाचवण्यासाठी आणि सुपीक क्षमता वाढवण्यासाठी (RSS To Start Soil Nutrition Campaign) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता भू-पोषण मोहीम सुरु करणार आहे. राजस्थानसह देशभरात चालवण्यात येणाऱ्या या अभियानाची सुरुवात 13 एप्रिलपासून होईल. संघाच्या उत्तर पश्चिम क्षेत्राचे (राजस्थान) संघचालक डॉ. रमेश अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगळुरुमध्ये झालेल्या संघाच्याअखिल भारतीय प्रतिनिधी सभेत हा निर्णय घेण्यात आला आहे (RSS To Start Soil Nutrition Campaign In All Over The Nation).
चैत्र शुल्क प्रतिपदा भूमीची उत्पत्ति मानली जाते आणि या दिवशी भूमी सुधार महाभियान सुरु केला जाईल. अभियानाअंतर्गत देशातील प्रत्येक तहसील स्तरावर गावागावात शेणावर आधारित जैविक खादचा उपयोग करण्यासाठी जागरुकता पसरवली जाईल.
यामध्ये संघाच्या ग्राम विकास विभाग, गौसेवा, पर्यावरण संरक्षणाव्यतिरीक्त अनेक धार्मिक, सामाजिक संघटना सोबत असतील. गायत्री परिवार, ईशा फाउंडेशन, पतंजली योगपीठसह 40 संस्था यामध्ये आहुती देतील. डॉ. रमेश यांनी सांगितलं की सध्याच्या परिस्थितीत रासायनिक खाद, किटनाशक, प्रदूषित जल आणि पॉलिथीनमुळे भूमी दूषित झाली आहे.
RSS ने पश्चिम बंगालमध्ये संघ व्यवस्थेत बदल केला आहे. तिथे संघ प्रांत दोनवरुन तीन करण्यात आले आहेत. आतापर्यंत उत्तर आणि दक्षिण बंगाल प्रांत होते. पण, यामध्ये विस्तार करुन यामध्ये विस्तार करुन दक्षिण प्रांतचे दोन प्रांत बनवण्यात आले. आता एक दक्षिण बंगाल आणि दुसरा मध्य बंगाल प्रांत असेल. अग्रवाल यांनी सांगितलं की बंगालमध्ये काम वाढलं आहे. तिथे आणखी चांगल्या पद्धतीने काम व्हावं, यासाठी तीन प्रांत बनवण्यात आलं आहे (RSS To Start Soil Nutrition Campaign In All Over The Nation).
– संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत दोन प्रस्ताव पारित झाले आहेत. पहिला राम मंदिर आणि दुसरा प्रस्ताव कोव्हिड दरम्यान भारताशी जोडलेला होता.
– यामध्ये एकत्रित आलेल्या सर्व संस्था तसेच व्यक्तींचा धन्यवाद व्यक्त केला. राम मंदिर निर्माणादरम्यान निधी समर्पण अभियानावर चर्चा झाली.
– देशभरातील शाखांचा विस्तार आणि हिंदू समाजाप्रर्यंत संघाच्या विचारांना पोहोचवण्याबाबत विचार झाला.
– कार्य विस्तार, समाज परिवर्तन, वैचारिक प्रबोधनावर काम करत पुढे जाऊ.
दिल्लीत नव्या उत्पादन शुल्क धोरणाची घोषणा; कायदेशीर मद्यपान करण्याचे वय आता 25 नव्हे, तर…#DelhiNewExcisePolicy #Manishsisodia https://t.co/2qHBhp4qZN
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 22, 2021
RSS To Start Soil Nutrition Campaign In All Over The Nation
संबंधित बातम्या :
अशी ही बनवाबनवी! मोदी सरकारच्या जाहिरातील घर मिळालेली महिला प्रत्यक्षात राहते झोपडीत
परमबीर सिंह न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून राज्य सरकारवर दबाव आणू पाहत आहेत का; संजय राऊतांचा सवाल
नवनीत राणांचे आरोप अरविंद सावंतांनी फेटाळले, आम्ही महिलांना कधीच धमकावत नाही- सावंत