नवी दिल्ली : रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये (Ukraine) गेल्या तीन दिवसांपासून युद्ध सुरू आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला (Russia Attack on Ukraine) केला आहे. या हल्ल्यामध्ये आतापर्यंत हजारो युक्रेनियन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान युद्ध सुरू झाल्यामुळे अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले होते. हवाई वाहतूक बंद असल्याने त्यांना भारतामध्ये येणे शक्य नव्हते. अखेर त्यांना आणण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला असून, आनंदाची बातमी म्हणजे आतापर्यंत दोन विमाने भारतामध्ये दाखल झाली आहेत. तर आज तिसरं विमान हंगेरीच्या बुडापेस्ट येथून दिल्लीला येण्यासाठी रवावना झाले आहे. या विमानात एकूण 240 भारतीय नागरिक प्रवास करत आहेत. ऑपरेशन गंगा अंतर्गत या विद्यार्थ्यांना भारतामध्ये आणले जात आहे. भारतात दाखल झालेल्या विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले असून, आम्हाला युक्रेनमधून भारतात सुखरूप आणल्याबद्दल आम्ही सरकारचे आभार मानतो असे त्यांनी म्हटले आहे.
रशियाने युक्रेनवर हल्ला केला आहे. गेल्या तीन दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे युक्रेनची हवाई वाहतूक पूर्णपणे बंद आहे. हवाई वाहतूक बंद असल्यामुळे अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले होते. त्यांना आता भारतामध्ये आणण्यात येत आहे. हवाई उड्डाण बंद असल्यामुळे थेट युक्रेनमधून विमानाचे उड्डाण शक्य नाही. त्यामुळे या विद्यार्थांना हंगेरी आणि रोमानियामध्ये आणून नंतर विमानाने भारतात आणले जात आहे. शनिवारी एक विमान भारतात दाखल झाले. त्यानंतर आज पहाटे देखील एक विमान भारतामध्ये आले आहे. हे विमान 250 प्रवाशांना घेऊन दिल्लीत दाखल झाले. आतापर्यंत एकूण 469 भारतीय नागरिकांना युक्रेनमधून बाहेर काढण्यात यश आले आहे. तर आज आणखी एक विमान 240 भारतीय नागरिकांना घेऊन हंगेरीतील बुडापेस्टमधून भारतात येण्यासाठी रवाना झाले आहे.
आतापर्यंत एकूण दोन विमाने युक्रेनमधून प्रवाशांना घेऊन भारतामध्ये दाखल झाले आहेत. त्यापैकी पहिले विमान शनिवारी दाखल झाले. ज्यामध्ये एकूण 219 प्रवाशांचा समावेश होता. दुसरे विमान हे आज पहाटे भारतात दाखल झाले ज्यामध्ये 250 प्रवाशी होते. असे आतापर्यंत एकूण युक्रेनमध्ये अडकलेले 469 भारतीय नागरिक भारतामध्ये परतले आहेत. तर एक विमान आता भारतात येण्यासाठी हंगेरीच्या बुडापेस्टमधून रवाना झाले आहे. या विमानामध्ये एकूण 240 प्रवाशांचा समावेश आहे.
The third flight of Operation Ganga carrying 240 Indian nationals from Budapest (Hungary) has taken off for Delhi #UkraineCrisis pic.twitter.com/8nG4vAIoEi
— ANI (@ANI) February 26, 2022