Russia Ukraine War : आतापर्यंत 17 हजार भारतीयांनी यूक्रेनची सीमा ओलांडली; तर पंतप्रधान मोदींनी पुन्हा बोलावली उच्चस्तरीय बैठक

| Updated on: Mar 02, 2022 | 9:57 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. दरम्यान, यूक्रेनमध्ये अडकलेल्या 20 हजार भारतीयांपैकी आतापर्यंत 6 हजार जणांना मायदेशी परत आणण्यात यश आलंय. तर 17 हजार भारतीय नागरिकांनी यूक्रेनची सीमा सोडली आहे. तशी माहिती MEA चे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी दिलीय.

Russia Ukraine War : आतापर्यंत 17 हजार भारतीयांनी यूक्रेनची सीमा ओलांडली; तर पंतप्रधान मोदींनी पुन्हा बोलावली उच्चस्तरीय बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदी
Follow us on

मुंबई : रशिया आणि यूक्रेनमध्ये सुरु असलेलं युद्ध (Russia Ukraine War) आता अधिक भीषण बनलं आहे. रशियाने (Russia) युद्धाच्या सातव्या दिवशी अधिक आक्रमकपणे हल्ले सुरु केले आहेत. अशावेळी हजारो भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांना यूक्रेनमधून (Ukraine) सुखरुपपणे मायदेशी परत आणण्याचं आव्हान भारत सरकारपुढे आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज पुन्हा एकदा उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. दरम्यान, यूक्रेनमध्ये अडकलेल्या 20 हजार भारतीयांपैकी आतापर्यंत 6 हजार जणांना मायदेशी परत आणण्यात यश आलंय. तर 17 हजार भारतीय नागरिकांनी यूक्रेनची सीमा सोडली आहे. तशी माहिती MEA चे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी दिलीय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रशियाच्या यूक्रेनवरील हल्ल्यानंतर सातत्याने जगभरातील नेत्यांच्या संपर्कात आहेत. मंगळवारी मोदींनी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅनुअल मॅक्रॉन यांच्याची चर्चा केली. यावेळी दोन्ही नेत्यांनी लवकरात लवकर युद्धविराम करण्याच्या मुद्द्यावर सहमती बनली आहे. दरम्यान, यूक्रेनमधील परिस्थिती अधिक खराब बनल्यामुळे भारताच्या यूक्रेनमधील दूतावासाने भारतीय नागरिकांना तातडीने खारकीव सोडण्याचं आवाहन केलं आहे. तसंच जवळच्या तीन सुरक्षित स्थानावर जाण्यास सांगितलं आहे, जे 16 किलोमीटर परिसरात आहेत.

रशिया कीव आणि खारकीव मोठा हल्ला करण्याची शक्यता

रशियानं यूक्रेनवर आक्रमण केलंय त्याला आता 7 दिवस पूर्ण होत आलेले आहेत. कीव हे राजधानीचं शहर अद्याप रशियाच्या पूर्णपणे ताब्यात आलेलं नाही. कीव अद्यापही ताब्यात येत नसल्यानं रशिया अस्वस्थ आहे. रशिया आज कीव शहरावर मोठ्या प्रमाणात हल्ला करु शकतं. याशिवाय खारकीव शहरावरही रशियाला कब्जा मिळवायचा असल्यानं खारकीवमध्ये मोठे हल्ले रशियन फौजांकडून केला जाण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या :

Russia Ukraine War : ऐकावं ते नवलच, इकडं उत्तर प्रदेशात गावची सरपंच तर यूक्रेनमध्ये एमबीबीएसची विद्यार्थीनी, यंत्रणाही गडबडली!

Russia Ukraine War : भारताला मिळणाऱ्या शक्तीशाली ब्रम्हास्त्राला अमेरिकेचा खोडा? कसं आहे s-400 मिसाईल?