Russia Ukraine War : अमेरिका (Us) रशियाकडून आयात होणाऱ्या गॅस, तेल (Oil Export) आणि उर्जेवर बंदी घालत आहे असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन (Jo Biden) यांनी म्हटले आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे जगातील बहुतेक देश रशियावर कडक निर्बंध घालत आहेत. अमेरिकेनेही याआधी तसा इशारा दिला होता. रशिया-युक्रेन वाद दिवसागणिक चिघळत चालला आहे. आगामी काळात नव्या समस्यांना तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रशियाची आर्थिक नाकेबंदी करण्यासाठी युरोपीय राष्ट्रांनी उचललेल्या पावलांवर रशियानं अख्खा जगालाच गर्भित इशारा दिला आहे. रशियाच्या उर्जा पुरवठ्यावर बंदी आणण्याचा प्रयत्न केल्यास पश्चिमीय राष्ट्रांना 300 डॉलर प्रति बॅरेल भावाने कच्चे तेल खरेदी करावे लागेल असे इशारा रशियानं दिला आहे. मात्र तेल आयतीवर अमेरिकेने बंदी घालून रशियाला पहिला चेकमेट देत कोंडी केली आहे.
एएनआय वृत्तसंस्थेचं ट्विट
“We’re banning all imports of Russian gas, oil, and energy,” announces US President Joe Biden
(File pic) pic.twitter.com/Lfi3tfa9Nf
— ANI (@ANI) March 8, 2022
अमेरिकेने इशारा खरा करून दाखवला
अमेरिका, युरोप आणि अन्य राष्ट्रे एकत्रित येऊन रशियाच्या ऊर्जा पुरवठ्याला ब्रेक लावला आहे. सर्व आंतरराष्ट्रीय घडामोडींचे पडसादामुळे वर्ष 2008 नंतर कच्च्या तेलाचे भाव पहिल्यांदाच 130 डॉलर प्रति बॅरेलवर पोहोचले आहेत. युरोपीय राष्ट्रांच्या दबावामुळं तेलाची खरेदी करण्यासाठी कोणतेही राष्ट्र पुढं धजावत नाही. रशियाची अर्थव्यवस्था कच्च्या तेलाच्या निर्यातीवर अवलंबून आहे. कच्च्या तेलाच्या निर्यातीला ब्रेक लागल्याने रशियाची अर्थव्यवस्था डळमळू शकते.
रशियाचे मोठी आर्थिक कोंडी
रशियामधून रशियासाठी कच्चा तेलाची मोठ्या प्रमाणात निर्यात होते. रशिया सर्वात मोठा तेल उत्पादक देश मानला जातो. रशियात दररोज 11 मिलियन बॅरेल तेलाचं उत्पादन घेतलं जातं. त्यापैकी अर्धा भाग निर्यात केला जातो. निर्यातीच सर्वाधिक प्रमाण युरोपीय राष्ट्रात आहे. रशियातून युरोपला दररोज नियमित स्वरुपात 2.5-3 बॅरेल तेल निर्यात केलं जातं. केवळ तेलच नव्हे तर युरोपला रशियातून गॅस पुरवठा केला जातो. त्यामुळे रशियावर निर्बंध लादल्यास जगाला परिणामांना सामोरं जावं लागेल असे रशियाचे उपपंतप्रधान नोवक यांनी म्हटलं होतं. युक्रेन विवादामुळं जर्मनीनं गेल्या महिन्यात रशियाला नॉर्ड स्ट्रीम-2 गॅस पाईपलाईनला सर्टिफिकेशन देण्यास नकारघंटा दर्शविली होती. त्यामुळे आता अमेरिकेच्या या निर्णयानंतर रशियाही मोठं पाऊलं उचलू शकते.
Fuel : कच्च्या तेलाचा आगडोंब, भाव 130 डॉलरच्या उंबरठ्यावर! पेट्रोल सव्वाशेपार जाणार?
Russia Ukrane War : …तर, अख्खा युरोप ‘गॅस’वर, कच्च्या तेलाचा भाव 300 डॉलर; रशियाची आगपाखड!
भारतीय सैन्यात दाखल होणार होता, आता युक्रेनकडून रशियाविरुद्ध लढतोय ‘हा’ तरूण