मतदारांना भूलवण्यासाठी मतदारसंघात आणली रशियन डान्सर; दारुच्या परवानगीसाठी थेट ‘या’ अधिकाऱ्यांकडे केली मागणी

| Updated on: May 04, 2023 | 12:35 AM

या निवडणुकीतील उमेदवार अपक्ष असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याने लिहिलेल्या पत्रात स्पष्टपणे निवडणूक अधिकाऱ्यांना डान्सच्या कार्यक्रमासाठी परवानगीही मागितली आहे.

मतदारांना भूलवण्यासाठी मतदारसंघात आणली रशियन डान्सर; दारुच्या परवानगीसाठी थेट या अधिकाऱ्यांकडे केली मागणी
Follow us on

कानपूर : उत्तर प्रदेशात निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहे. कानपूरमध्ये महानगरपालिकांच्या निवडणुका लागल्याने मतदारांना आकर्षित करण्यासाठी लोकप्रतिनिधींकडून नवनव्या कल्पना अंमलात आणल्या जात आहेत. कानपूर महापालिका निवडणुकीत आणखी राजकीय पक्ष आपल्या मतदारांना आकर्षित करण्यात प्रचंड व्यस्त झाला आहे. शहराचे प्रश्न सोडविण्यासाठी राजकारणीही जनतेसाठी पाहिजे ती प्रलोभनात्मक आश्वासनं देत आहेत. त्यामुळे नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारांचा वेगवेगळ्या प्रकारे जोरदार प्रचार सुरु आहे.

आपल्या प्रभागातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी एका अपक्ष उमेदवाराने रशियातील नृत्यांगनाला आमंत्रित करण्यात आले आहे.

रशियन डान्सरचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओसोबत सोशल मीडियावर एक पत्रही व्हायरल होत आहे.

या पत्रात कानपूरच्या काकादेव भागातील आंबेडकर पुरम येथील अपक्ष नगरसेवक संजय यांचे नाव लिहिले आहे. त्यांनी आपल्या प्रभागात रशियन नृत्य करण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांकडे परवानगी मागितल्याचे बोलले जात आहे. तोच व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

त्यामध्ये एक मुलगी नृत्य करताना दिसून येत आहे.त्यामुळे आता व्हायरल झालेल्या व्हिडिओची तातडीने दखल घेत तपास सुरू करण्यात आला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पत्रात आंबेडकर पुरममधील अपक्ष उमेदवार संजय दुबे यांनी रशियन डान्सर आणि मद्यपानासाठी परवानगी मागितली होती.

परवानगीसाठी लिहिलेल्या पत्राचा आणि नृत्याचा व्हिडिओही समोर आल्यानंतर आता सोशल मीडियावरून या प्रकारची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

या निवडणुकीतील उमेदवार अपक्ष असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याने लिहिलेल्या पत्रात स्पष्टपणे निवडणूक अधिकाऱ्यांना डान्सच्या कार्यक्रमासाठी परवानगीही मागितली आहे. या उमेदवाराला रशियन डान्सर आणि दारू देऊन लोकांना आपल्या भागातील मतदारांना खूष करायचे आहे.