युक्रेनच्या कैद्यांना घेऊन जाणारे रशियाचे विमान क्रॅश, 65 जणांची जाग्यावरच राख, थरकाप उडवणारा Video समोर

| Updated on: Jan 24, 2024 | 5:51 PM

Russian military Plane Crash Video : रशियन विमानाचे अपघात झाला असून यामध्ये कैदी असणाऱ्यास युक्रेनच्या सैनिकांची जाग्यावरच राख झाली आहे. एक दोन नाहीतर तब्बल 65 सैनिकांचा यामध्ये मृत्यू झालाय.

युक्रेनच्या कैद्यांना घेऊन जाणारे रशियाचे विमान क्रॅश, 65 जणांची जाग्यावरच राख, थरकाप उडवणारा Video समोर
russian military plane crashes Video
Follow us on

नवी दिल्ली : युक्रेनच्या युद्धकैद्यांना घेऊन जाणारे रशियाचे विमान क्रॅश झालं आहे. रशियाचे इल्युशिल इल-76 लष्करी हे विमान कोसळलं आहे. विमाना खाली कोसळतानाचा व्हिडीओ समोर आलं आहे. कारण विमान खाली कोसळल्यावर मोठा स्फोट झाला. या विमानामध्ये जवळपास 65 बंदी सैनिक होते. सोशल मीडियावर व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. रशियन संरक्षण मंत्रालयानेही विमानात कोण कोण होतं याबाबत माहिती दिली आहे.

पाहा व्हिडीओ:- 

 

संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, अपघात झालेलं IL-76 लष्करी वाहतूक विमान होते. विमानामध्ये युक्रेनचे पकडलेले 65 सैनिक होते. या सैनिकांना बेल्गोरोड या भागात नेलं जात होतं. युक्रेनियन युद्धकैद्यांना युक्रेनला नेलं जात होतं. मृतांमध्ये या सैनिकांमध्ये सहा क्रू मेंबर्स आणि तीन एस्कॉर्ट यांचा समावेश होता.

IL-76 लष्करी वाहतूक विमान हे सैनिकांसह लष्करी उपकरणे वाहून नेण्यासाठी त्याचा वापर केला जातो. यामध्ये पाच लोकांचा क्रू असतो. या विमानामध्ये एकावेळी 90 प्रवासी वाहून नेण्याची क्षमता आहे.  रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून युद्ध सुरू आहे. जवळपास दीड वर्षांपासून या दोन्ही देशांमध्ये जोरदार युद्ध सुरू आहे. दोन्ही देशांनी एकमेकांच्या सैनिकांची देवाणघेवाण केलीये. रशियाने युक्रेनच्या 230 बंदीसैनिकांची सुटका केली आहे. तर युक्रेन देशानेही रशियाच्या 248 सैनिकांची सुटका केलीये.