मॉस्को : रुसमध्ये देशांतर्गत बंडखोरी पाहायला मिळत आहे. रुसच्या प्राइव्हेट आर्मीने रुस विरुध्द बंड केलेच. मात्र बंडाच्या 12 तासांच्या आतच राष्ट्रपती पुतिन यांनी बंड मोडून काढलं. बेलारुसचे राष्ट्रपती अलेक्झांडर लुकाशेंको यांनी मध्यस्ती करत हा बंड मोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. येवगेनी प्रिगोझिनची प्राइव्हेट आर्मी पुन्हा त्यांच्या कॅम्पमध्ये जात आहे. या प्राइव्हेट आर्मीचा राजधानी मॉस्को ताब्यात घेण्याचा इरादा होता.
राष्ट्रपती पुतिन यांच्या विरोधात हा पहिलाच बंड नव्हता, याआधीही त्यांच्याविरोधात बंड झालेला होता. पण, प्रत्येक वेळा बंड मोडत सर्वोच्च सत्ता आपल्या ताब्यात ठेवत पुतिन सत्तेवर आहेत. मागच्या 23 वर्षात अनेक बंडाला सामोरे जात, त्यांचा बिमोड करत राष्ट्रपती पुतिन सत्तेवर आहेत.
1999 ला पहिल्यांदा पुतिन यांच्या विरोधात कटकारस्तान रचले गेले. 1999 साली पुतिन रुसचे काळजीवाहू राष्ट्रपती बनले. यानंतरच 12 ऑगस्ट 2000 साली रुसच्या न्यूक्लियर सबमरीन क्रुस्कचा समुद्रात अपघात झाला. या अपघातामागे पुतिन विरोधी असल्याचे म्हटले जाते.
23 ऑक्टोबर 2002 रोजी पुतिन यांना अजून एका बंडाला सामोरं जावं लागलं. चेचेन्या प्रांतातील रुसी सैन्य हटवण्यासाठी चेचेन बंडखोरांनी मॉस्को येथील दुब्रोवका थेटर मध्ये फायरिंग करत 850 लोकांना बंदी बनवले. या बंडामध्ये 50 सशस्त्र बंडखोरांमध्ये काही महिलांचाही समावेश होता. या हल्ल्यात 130 लोक मारले गेले. रुसी सैनीकांनी थोड्याच वेळात या हल्लेखोरांना जमीनदोस्त करत बंड मोडून काढला.
2004 ला पुतिन यांची राष्ट्रपती म्हणून निवड झाली. निवड होताच पुतिन यांनी पहिले काम मीडियावर नियंत्रण आणण्याचे केले. सरकारने लोकांपर्यत पोहचाऱ्या बातम्यांवर नियंत्रण ठेवलं होतं. रुसमधील टीव्ही चॅनल राजकीय बातम्या दाखवत नाहीत, जरी दाखवल्या तरीही त्या सरकार नियंत्रित असतात. रुसची सरकारी ‘आरटी मीडिया कंपनी’ ही संपूर्ण जगात रुसच्या बातम्या पोहचवते.
रुसच्या सरकारवर नियंत्रण मिळवू शकणाऱ्या शक्तीशाली कुलीन वर्गावर पुतिन यांनी कारवाई केली. या वर्गातील श्रीमंत लोकांची बदनामी केली गेली. मिखाइल खोदोरकोव्सकी या बड्या तेल व्यापाऱ्याला ‘यूकोस’ तेल कंपनीच्या सीईओ पदावरुन हटवण्यात आले. यानंतर त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपात तुरुंगात डांबण्यात आले. 2013 साली खोदोरकोव्सकी याने स्वित्झर्लंड मध्ये शरण घेतली.
सोव्हियत संघाचे विघटन झाल्यानंतर रुसला पुन्हा एकदा सोव्हियत संघ तयार करायचा आहे. यासाठीच 2014 साली क्रीमिया प्रांतात जनमत संग्रह घेण्यात आला. 97 टक्के जनतेने रुसच्या बाजूने कौल दिला आणि क्रीमिया रुसच्या ताब्यात आले. राष्ट्रपती पुतिन यांना जगभर यासाठी विरोध झाला होता. अमेरिका आणि युरोपीय देशांनी रुसवर अनेक प्रतिबंध लावले. यानंतर अमेरिका आणि रुस मध्ये वातावरण चांगलेच तापले होते. रुसवर या प्रतिबंधाचा काहीही परिणाम झाला नाही.
राष्ट्रपती पुतिन यांचे विरोधी बोरिस नेम्त्सोव यांची हत्या 2015 साली करण्यात आली. या हत्येमागे पुतिन असल्याचे बोललो जाते. पुतिन यांच्याविरोधान रुस मध्ये वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न बोरिस करत होते, यामुळे त्यांची हत्या क्रेमलिनच्या बाहेर गोळ्या झाडून करण्यात आली.
ब्रिटेनमध्ये रुसचे गुप्तहेर सर्गेइ स्क्रीपल (66) आणि त्यांची मुलगी यूलिया (33)यांनी विष देवून मारण्यात आले. सर्गेइ स्क्रीपल हे रुस सैन्यातील निवृत्त अधिकारी होते. स्क्रीपलने ब्रिटिश गुप्तचर एजेंसी एमआय – 16 ला यूरोपातील रुसी गुप्तचर विभागाची माहिती देण्याचा आरोप रुसने केला होता. रुसने एमआय – 16 वर स्क्रीपलला 1 लाख डॉलर देण्याचा आरोप केला होता. यानंतर स्क्रीपल याला विष देवून मारलेलं.