India vs Maldives | वादानंतर सचिन तेंडुलकर कोकणातल्या ‘या’ किनाऱ्यावर खेळला बीच क्रिकेट

| Updated on: Jan 08, 2024 | 1:40 PM

Boycott Maldives हा ट्रेंड सुरू झाला असून भारतातील अनेक सेलिब्रिटींनीही याचं समर्थन केलं आहे. त्यातच आता क्रिकेटचा देव अशी ख्याती असलेला, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने केलेलं एक ट्विट बरंच चर्चेत आलं आहे.

India vs Maldives |  वादानंतर सचिन तेंडुलकर कोकणातल्या या किनाऱ्यावर खेळला बीच क्रिकेट
Image Credit source: social media
Follow us on

India vs Maldives | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर त्यांचे फोटो बरेच व्हायरल झाले. मात्र या दौऱ्यानंतर भारत विरुद्ध मालदीव वादाला सुरूवात झाली आहे. पंतप्रधान मोदी यांनी लक्षद्वीप भेटीनंतर काही फोटोज सोशल मीडियावर पोस्ट केले. त्यावर मालदीव सरकारमधील काही मंत्र्यांनी आपत्तीजनक टिप्पणी केल्याने या सर्व वादाला सुरूवात झाली. त्याचे पडसाद सर्वत्र उमटताना दिसले. सोशल मीडियावर तर Boycott Maldives हा ट्रेंडही सुरू झाला. यामुळे मालदीव प्रशासन बॅकफूटवर गेलं आणि हा सर्व वाद शांत करण्याचा प्रयत्न सुरू झाला. या वादात मालदीवमध्ये एकाचवेळी तीन मंत्र्यांना निलंबित करण्यात आलं आहे. भारत सरकारने एकदम आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र मालदीवला हा वाद चांगलाच महागात पडला आहे.

सचिने तेंडुंलकरच्या त्या ट्विटने वेधलं लक्ष

या सर्व पार्श्वभूमीवर Boycott Maldives हा ट्रेंड सुरू झाला असून भारतातील अनेक सेलिब्रिटींनीही याचं समर्थन केलं आहे. त्यातच आता क्रिकेटचा देव अशी ख्याती असलेला, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने केलेलं एक ट्विट बरंच चर्चेत आलं आहे. सचिनने सिंधुदुर्ग पर्यटनावर ट्विट केलं आहे. गेल्या वर्षी सचिन हा त्याच्या कुटुंबियांसह सिंधुदुर्गात वाढदिवस साजरा करण्यासाठी गेला होता. तिथलं निसर्ग सौंदर्यावर व पाहूणचार यावर क्रिकेटचा देव भलताच खूश झाला होता. त्या आठवणीला २५० पेक्षाही जास्त दिवस उलटून गेल्यानंतरही सचिनच्या मनात त्या आठवणी ताज्या आहेत.

 

त्याचं आठवणींना सचिनने ट्विटद्वारे पुन्हा उजाळा दिला आहे. लक्षद्वीपच प्रमोशन होत असल्याचा टायमिंग साधत टायमिंगच्या या बादशहाकडून अचूक ट्विट करण्यात आलं आहे. #ExploreIndianIslands असा हॅशटॅगही सचिनने युज केला आहे. लक्षद्वीप बरोबरच सिंधुदुर्गच्या निसर्ग सौंदर्याची चर्चा सुरू आहे.

नितेश राणेंनही केलं ट्विट

दरम्यान Boycott Maldives हे ट्रेंड होत असताना आमदार नितेश राणे यांनीही कोकणातील निसर्ग सौंदर्यांचे फोटो पोस्ट केले आहेत. ‘येवा कोंकण आपलोच आसा’ असं ट्विट त्यांनी केलं आहे.