मुंबई : राज्यात सध्या हिंदुत्वाच्या (Hindutva) मुद्द्यावरून राजकारण तापलं असताना आणखी एक खळबळजनक विधान समोर आलं आहे. हे विधान साध्वी ऋतंभरांचं (Sadhvi Rithambara) आहे. त्यांनी थेट हिंदू राष्ट्राच्या निर्माणाची हाक देत लोकांना एक अजब सल्ला देऊन टाकलाय. देशात लोकसंख्या (Population) कशी अटोक्यात राहील याबाबत विचार आणि अनेक सरकारी योजना सुरू आहेत. मात्र दुसरीकडे या साध्वींनी थेट हिंदूराष्ट्रासाठी प्रत्येक हिंदुंनी 4 मुलं जन्माला घाला, असा अजब सल्ला देऊन टाकला आहे. त्यामुळे आता पुन्हा नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून देशात बराच वाद सुरू आहे. राज्यातही यावरून सध्या जोरदार घमासान सुरू आहे. राज्यातले राजकीय पक्ष एकमेकांना हिंदुत्वावरून रोज सवाल आणि रोज एकमेकांवर आरोप करत आहेत, अशात आलेल्या या वक्तव्यावर आता जोरदार प्रतिक्रिया उमटू शकतात.
गेल्या काही दिवसात उत्तर प्रदेशचे राजकाणही अशात काही मुद्द्यांवरून तापलं आहे. देशात सध्या तापलेला अजनचा मुद्दा ही आणखी तापला आहे. अजान आणि त्याच्या लाऊड स्पीकरवरून सध्या देशात चांगलेच राजकारण तापलं आहे. हनुमान जयंतीवेळी झालेली हाणामारीची घटनाही सध्या ताजी आहे. मात्र मोहोत्सव नावाच्या कार्यक्रमात साध्वी ऋतंभरा यांनी केलेल्या या वक्तव्यावरून आता नवा वाद सुरू झाला आहे. कानपूरमध्ये विश्व हिंदू परिषदेतर्फे रामोत्सवाचे आयोजन केले गेले होते, आणि याच कार्यक्रमात हम दो हमारे दो नाही, तर हिंदु राष्ट्रासाठी चार मुलं जन्माला घाला असे आवाहन साध्वी यांनी केले. प्रत्येक हिंदुने फक्त दोन अपत्यांच्या विचारातून बाहेर आले पाहिजे, असा सल्लाही त्या देताना दिसून आल्या.
साध्वी ऋतंभरा एवढेच सांगून थांबल्या नाहीत. तर त्यांनी चार मुलांचं काय करायचं याचा प्लॅनही लोकांना सांगून टाकला. दोन मुलं कुटुंबासाठी राहिली पाहिजेत आणि दोन मुलं ही हिंदू राष्ट्राच्या कामाला आली पाहिजेत असेही त्या म्हणाल्या. तसेच त्यासाठीचे पर्यायही त्यांची सूचवून टाकले. 2 मुलं RSS, विश्व हिंदू परिषदला द्या, म्हणजे हिंदू राष्ट्र निर्माण होण्यास मदत होईल, असा अजब सल्ला त्यांनी देऊन टाकला. उत्तर प्रदेशच्या तापलेल्या राजकारणावेळी अशा वादग्रस्त विधानाने हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. मात्र राजकीय वाद जरी थोडा वेळ बाजुला ठेवला तरी कुटुंबनियोजनाच्या दृष्टीनेही या विधानावर जोरदार टीका होण्याची शक्यता आहे.
लेफ्टनंट जनरल मनोज पांडे आता देशाचे नवे सेना प्रमुख; त्यांच्या नियुक्तीसाठी सरकारचा ग्रीन सिग्नल
Sharad Pawar on Raj Thackeray: कुणाला धोका असेल आणि सुरक्षा पुरवली जात असेल तर हरकत नाही: शरद पवार