‘ते तर पट्टीचे कलाकार, नाटक करतायेत’, जया बच्चन यांची खासदार प्रताप सारंगी यांच्यावर टिप्पणी, हिवाळी अधिवेशनात पुन्हा तापले वातावरण

| Updated on: Dec 21, 2024 | 11:54 AM

Jaya Bachchan attack on Pratap Sarangi : बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या खासदार जय बच्चन यांच्या वक्तव्याने आता हिवाळी अधिवेशनात वातावरण तापले आहे. भाजपचे खासदार जय बच्चन यांनी सारंगी यांना अशा शब्दात फटकारले

ते तर पट्टीचे कलाकार, नाटक करतायेत, जया बच्चन यांची खासदार प्रताप सारंगी यांच्यावर टिप्पणी, हिवाळी अधिवेशनात पुन्हा तापले वातावरण
जया बच्चन यांचा आरोप
Follow us on

समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी शुक्रवारी विरोधकांना चांगलेच सुनावले. रुग्णालयात उपचार घेत असलेले भाजपाचे खासदार प्रताप सिंह सारंगी हे नाटक करत असल्याचा आरोप त्यांनी केले. ते पट्टीचे कलाकार असल्याचा टोला त्यांनी लावला. त्यांना उत्तम अभिनयाचा पुरस्कार देण्यात यावा असा चिमटा पण त्यांनी काढला. भाजपाचे खासदार प्रताप चंद्र सारंगी, मुकेश राजपूत आणि एस. फांगनोन कोन्याक यांच्यापेक्षा मुरलेले कलाकार आपण कधी उभ्या आयुष्यात पाहीले नाही, असा टोला त्यांनी लगावला.

भाजपाचा पलटवार

जया बच्चन यांच्या आरोपानंतर आता भाजपाने पलटवार केला आहे. हीच इंडिया आघाडीची खरी संस्कृती असल्याचा आरोप त्यांनी केला. जया बच्चन या पीडित व्यक्तीसोबत नाही तर हल्लेखोरासोबत असल्याचा दावा त्यांनी केला. राहुल गांधी यांच्यावर भाजपाने गंभीर आरोप केला आहे आणि गुन्हा दाखल केला आहे.

हे सुद्धा वाचा

काय आहे प्रकरण?

गुरूवारी दिल्ली पोलिसांनी संसद परिसरातील धक्काबुक्की प्रकरणात राहुल गांधी यांच्याविरोधात FIR दाखल केला. राज्य घटनेचे निर्माते बी. आर. आंबेडकर यांचा अपमान केल्या प्रकरणात गुरुवारी संसद भवनाच्या मकर गेटवर सत्ताधऱ्याावर आणि विरोधक एकमेकांसमोर आले होते. त्यावेळी एकमेकांविरोधात त्यांनी जोरदार नारेबाजी केली. त्यावेळी खासदारांमध्ये धक्का-बुक्की केली. त्यात माजी मंत्री प्रतापचंद्र सारंगी आणि लोकसभा सदस्य मुकेश राजपूत जखमी झाले.

राहुल गांधी विरोधात 6 कलमातंर्गत FIR दाखल

भाजपाचे खासदार अनुराग ठाकुर आणि बांसुरी स्वराज यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात हत्येचा प्रयत्न, धक्का देणे यसह इतर कलमान्वये पोलीसात तक्रार दिली होती. तर पोलिसांनी कलम 109 (हत्येचा प्रयत्न) हटवले. आता एकूण 6 कलमातंर्गत गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये जखमी करणे, धक्का देणे अशा कलमातंर्गत गुन्हा दाखल केला आहे.

मी असला अभिनय अद्याप पाहीला नही

सारंगी हे नाटक करत आहेत. मी माझ्या संपूर्ण जीवनात अद्याप असला अभिनय पाहीला नसल्याचा दावा त्यांनी केला. रुग्णालयात उपचार घेत असलेले भाजपाचे खासदार प्रताप सिंह सारंगी हे नाटक करत असल्याचा आरोप त्यांनी केले. ते पट्टीचे कलाकार असल्याचा टोला त्यांनी लावला. त्यांना उत्तम अभिनयाचा पुरस्कार देण्यात यावा असा चिमटा पण त्यांनी काढला.