Sambhaji Chhatrapati: ना भाजप, ना राष्ट्रवादी, ना काँग्रेस; संभाजी छत्रपतींनी दिले पक्ष स्थापन करण्याचे संकेत

| Updated on: May 03, 2022 | 6:10 PM

Sambhaji Chhatrapati: संभाजी छत्रपती यांची राज्यसभा खासदारकीची टर्म आज समाप्त होत आहे.

Sambhaji Chhatrapati: ना भाजप, ना राष्ट्रवादी, ना काँग्रेस; संभाजी छत्रपतींनी दिले पक्ष स्थापन करण्याचे संकेत
ना भाजप, ना राष्ट्रवादी, ना काँग्रेस; संभाजी छत्रपतींनी दिले पक्ष स्थापन करण्याचे संकेत
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

योगेश बोरसे, नवी दिल्ली: संभाजी छत्रपती (Sambhaji Chhatrapati) यांची राज्यसभा सदस्यत्वाची टर्म आज संपली. त्यामुळे संभाजी छत्रपती हे आता राष्ट्रवादी (ncp) किंवा काँग्रेसमध्ये (congress) प्रवेश करण्याची चर्चा सुरू झाली. काँग्रेस नेत्यांनी जाहीरपणे संभाजी छत्रपती यांना काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली. त्यामुळे संभाजीराजे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र, संभाजीराजे यांनीच या चर्चांना पूर्ण विराम दिला आहे. 6 मे नंतर पुण्यात पत्रकार परिषद घेणार आहे. यावेळी स स्वतंत्र पक्ष काढायचा की अजून काही वेगळा निर्णय घ्यायचा हे ठरवू. त्याच दिवशी सर्व गोष्टी स्पष्ट करू, असं संभाजी छत्रपती यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे संभाजी छत्रपती हे नवा राजकीय पक्ष काढण्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

संभाजी छत्रपती यांनी मीडियाशी संवाद साधला. गेल्या सहा वर्षात खासदार म्हणून मी काम केलं. उद्या खासदार असलो नसलो तरी माझे काम चालूच ठेवणार आहे. 3 मेच्या नंतर मी माझी भूमिका जाहीर करेल असं म्हटले होते. आता 6 मे नंतर मी माझी भूमिका आणि पुढील वाटचाल स्पष्ट करणार आहे, असं संभाजी छत्रपती यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

 

“आजन्म विचारांशी बांधील”

संभाजी छत्रपती यांची राज्यसभा खासदारकीची टर्म आज समाप्त होत आहे. या पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांनी आज सकाळी ट्विटर फोटो पोस्ट करीत एक सूचक इशारा दिलेला आहे. या फोटो मध्ये संभाजीराजे हे छत्रपती शाहू महाराजांवरील पुस्तक वाचताना दिसत असून मागे छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या मोठ्या तसबीरी आहेत. तसेच शाहूपुत्र छत्रपती राजाराम महाराज, संभाजीराजे यांचे आजोबा मेजर जनरल छत्रपती शहाजी महाराज व वडील विद्यमान छत्रपती शाहू महाराज यांच्याही प्रतिमा या फोटोमध्ये दिसत आहेत. या फोटो सोबत संभाजीराजे यांनी “आजन्म विचारांशी बांधील” असेही म्हटले आहे. निश्चितच संभाजीराजे यांना ते आपल्या या पूर्वजांच्या विचारांशी बांधील आहेत, हेच म्हणायचे आहे.

सूचक ट्विट

काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना संभाजीराजे यांनी आपली पुढची राजकीय दिशा 3 मे रोजी माझी टर्म संपल्यानंतर जाहीर करेन, असे सांगितले होते. आज संभाजीराजे यांनी हा फोटो ट्विट करीत एक सूचक कल्पना दिली आहे का? अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. कालच कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी संभाजीराजे काँग्रेस मध्ये यावेत अशी इच्छा जाहीररित्या व्यक्त केली. या सर्व बाबींच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजेंचे हे ट्विट त्यांची पुढील राजकीय भूमिका काय असेल, याचा एक सूचक अंदाज देणारे आहे.