मुंबई : कर्नाटक (Karnataka News) राज्यातील कलबुर्गी जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी एक अवैध वाळूचा (Sand Mafia) ट्रक निघाला होता. त्यावेळी पोलिस कर्मचाऱ्याने चालकाला थांबण्यासाठी इशारा केला. त्यावेळी चालकाने ट्रक पोलिस कर्मचाऱ्याच्या अंगावर घातला, त्यावेळी पोलिस कर्मचाऱ्याचा जागीचं मृत्यू झाला आहे. ही घटना जीवर्गी येथील नारायणपुरा गावात घडली आहे. 51 वर्षाचे हेड पोलिस कॉन्टेबल एम चौहान यांनी ट्रकची (truck accident) चौकशी करण्यासाठी ट्रक थांबवला होता. त्यावेळी ट्रकचा चालकाने चौहान यांच्या अंगावर गाडी घातली. त्यामुळे त्यांचा जागीचं मृत्यू झाला आहे.
कुलबुर्गी येथील वरीष्ठ पोलिस अधिकारी ईशा पंत यांनी सांगितलं की, चालक सिधन्ना याला अटक केली आहे. पोलिस त्या चालकाची कसून चौकशी करणार आहेत. त्याचबरोबर पोलिसांनी ट्रक सुध्दा ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी ट्रकचा चालक आणि मालक असं दोघांच्यावरती गुन्हा दाखल केला आहे.
कर्नाटक राज्यात अनेक जिल्ह्यात अवैध वाळूचा उपसा अनेक ठिकाणी सुरु आहे. वारंवार कारवाई करुन सुध्दा वाळू माफिया करायचं ते करीत आहे. जीवर्गी येथील नारायणपुरा गावात अवैध वाळूचे अनेक ट्रक जात असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. ज्यावेळी तिथं एक ट्रक आला, त्यावेळी पोलिस कॉन्टेबल एम चौहान हे ड्युटीवरती होते. त्यांनी ट्रकला बाजूला घेण्याचा इशारा केला. परंतु ट्रक चालकाने बाजूला ट्रक न घेता, त्यांच्या अंगावर चढवला. त्यामुळे त्यांचा जागीचं मृ्त्यू झाला आहे. पोलिस कॉन्टेबल एम चौहान यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.