तुम्ही मुके घेतले, तुम्ही निस्तरा; संजय राऊत यांनी ठरवले ‘यांना’ गुन्हेगार

| Updated on: Mar 15, 2023 | 2:22 PM

शीतल म्हात्रे प्रकरणावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. तो व्हिडीओ मॉर्फ आहे की नाही हा नंतरचा प्रश्न आहे. आधी ओरिजिनल व्हिडीओ दाखवा. तो व्हिडीओ खरा की खोटा हे आधी स्पष्ट होऊ द्या, असं राऊत म्हणाले.

तुम्ही मुके घेतले, तुम्ही निस्तरा; संजय राऊत यांनी ठरवले यांना गुन्हेगार
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली : शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मॉर्फिंग व्हिडीओ प्रकरणावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. तुम्ही मुका घ्या नाही तर मिठ्या मारा. आम्हाला का टार्गेट करत आहात? आमच्या कार्यकर्त्यांना का अटक केली जात आहे? तुम्ही मुके घेतले, तुम्हीच निस्तरा. त्याच्याशी आम्हाला घेणंदेणं नाही, असं सुनावतानाच सार्वजनिक ठिकाणी मुका घेणारे सुर्वे हे पहिले गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही? असा सवाल संजय राऊत यांनी केला. तसेच सुर्वे यांच्या मुलानेच तो व्हिडीओ लाईव्ह केला होता. त्याला अटक का केली नाही? असा सवाल संजय राऊत यांनी केला.

मुंबईत व्हिडीओचं प्रकरण सुरू आहे. मुका घ्या मुका नावाचा सिनेमा सुरू आहे. आज दादा कोंडके हवे होते. त्यांचा सिनेमा गाजला होता. मुका घ्या मुका. मुका घ्या मुका प्रकरणात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना का अटक करता? त्यांचा संबंध काय? हा सत्तेचा गैरवापर आहे. पोलीस यंत्रणेचा गैरवापर आहे. तुमच्या मुका प्रकरणात शिवसैनिकांचा संबंध काय? आम्ही सांगितलं का सार्वजनिक कार्यक्रमात मुका घ्यायला? मुळात तो व्हिडीओ खरा की खोटा हे आधी समोर येऊ द्या. मॉर्फींगचा विषय नंतर येईल, असं संजय राऊत म्हणाले.

हे सुद्धा वाचा

शिवसेनेला लक्ष्य करू नका

मी तो व्हिडीओ पाहिला नाही. पण मला असंख्य कार्यकर्ते फोन करत आहेत. आमच्या घरावर पोलीस आले. आमच्या कार्यालयात पोलीस आले, असं कार्यकर्ते सांगत आहेत. काय प्रकार सुरू आहे? तो व्हिडीओ आमदाराच्या मुलानं शेअर केला. त्याला अटक केली का? नाही ना? मग कुणाची बदनामी करत आहात? तुमच्या पक्षातील अंतर्गत भांडणं असतील तर तुम्ही मिटवा. शिवसेनेला लक्ष्य करू नका, असा इशारा राऊत यांनी दिला.

मुका घ्या किंवा मिठ्या मारा

प्रकाश सुर्वे बाहेर आले पाहिजे. त्यांनी बोललं पाहिजे. मुका घेणारे पहिले गुन्हेगार तेच आहेत. दादा कोंडके यांनी त्यांच्यावर सिनेमाच काढला असता. दादाचा सिनेमा होता. आता शिंदे सरकारचा सिनेमा सुरू आहे. हा त्यांचा प्रश्न आहे. तुम्ही काहीही करा. मुका घ्या किंवा मिठ्या मारा. सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला पाहिजे.

तुम्ही आमच्या लोकांना अटक करत आहात. आमच्या लोकांना धमक्या देत आहात. आमच्या शिवसैनिकांचे दरवाजे ठोठावत आहात. त्यांच्या बायकांना आणि पालकांना धमक्या देत आहात. ही काय मोगलाई सुरू आहे का? तुम्ही मुके घेतले, तुम्ही निस्तरा. आमच्यावर बोट दाखवू नका. मग शाहिस्ते खानाची बोट तुटली हे लेक्षात घ्या, असा इशाराही त्यांनी दिला.