नवी दिल्ली | 27 February 2024 : देशाचा मूड काय आहे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी देशालाच नाही तर जगाला देशातील सर्वात मोठे न्यूज नेटवर्क टीव्ही9 मंचावरुन सांगितले. विजयाची हॅटट्रिक नोंदविण्याचा दावा त्यांनी केला. आज या वैचारिक मंचावर राजकीय खडाजंगी होणार आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतील. सताधाऱ्यांसह विरोधी गोटातील बडे नेते तुम्हाला एकाच मंचावर पाहायला मिळतील. आजच्या तिसऱ्या आणि अखेरच्या सत्रात लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर देशाचा मूड काय आहे, याचा अंदाज जोखता येईल. आज या विचार मंचावर देशातील नेत्यांची मांदियाळी पाहयाला मिळेल.
या नेत्यांची हजेरी
सत्ता संमेलनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, कृषी मंत्री अर्जून मुंडा, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा, एआयएमआयएमचे असदुद्दीन ओवेसी, बाबा रामदेव, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पवन खेरा, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णु देव साय, भूपेंद्र यादव, पंजाबचे मुख्यंत्री भगवंत मान, मोहन यादव, मनोज सिन्हा हे सहभागी होतील.
7 राज्यांचे मुख्यमंत्री येणार
दिल्लीच्य अशोका हॉटेलमध्ये सत्ता संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या मंचावर मध्यप्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, आसामसह 7 राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी होतील. यामध्ये 5 भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री तर 2 मुख्यमंत्री आम आदमी पक्षाचे असतील. तर दोन मुख्य राष्ट्रीय पक्ष भाजप आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष (जेपी नड्डा आणि मल्लिकार्जुन खरगे) या मंचाची शान वाढवतील. अमित शाह यांच्या समारोपीय भाषणानंतर कार्यक्रमाची सांगता होईल.
NDA 400 पार