‘सावरकर ब्राह्मण होते, तरीही गोमांस खायचे’, कर्नाटकच्या या मंत्र्यांच्या दाव्याने वादाला फोडणी

| Updated on: Oct 03, 2024 | 11:33 AM

Karnataka Health Minister : कर्नाटकचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडुराव यांच्या एका विधानाने सध्या खळबळ उडाली आहे. सावरकर ब्राह्मण असले तरी ते गोमांस खायचे असा दावा त्यांनी केला. एवढ्यावरच न थांबता, त्यांनी गोमांस खाण्याचा प्रचार केल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला. त्यानंतर आता राजकारण तापलं आहे.

सावरकर ब्राह्मण होते, तरीही गोमांस खायचे, कर्नाटकच्या या मंत्र्यांच्या दाव्याने वादाला फोडणी
आरोग्य मंत्र्यांच्या विधानाने तापले राजकारण
Follow us on

कर्नाटकचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री दिनेश गुंडुराव यांच्या एका दाव्याने राजकीय वातावरण तापले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर ब्राह्मण होते. पण ते गोमांस खात होते, असा दावा गुंडुराव यांनी केला. इतकेच नाही तर त्यांनी गोमांस खाण्याचा प्रचार केल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला. सावरकरांनी कधीच गोहत्येचा विरोध केला नाही. याबाबतीत त्यांचे विचार अत्यंत पुढारलेले होते, असे गुंडुराव म्हणाले. त्यांचे विचार कट्टर असले तरी दुसऱ्या बाजूने ते आधुनिक होते असे ते म्हणाले.

महात्मा गांधी कट्टर शाकाहारी

ब्राह्मण असले तरी सावरकर सार्वजनिक गोमांस खायचे. त्याचा प्रचार करायचे, असा गुंडुराव म्हणाले. त्यांनी भाषणात महात्मा गांधी आणि पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद जिना यांचा उल्लेख केला. गांधी हे हिंदू सांस्कृतिक रुढीवादाचे मूर्तिमंत उदाहरण होते. पण ते कट्टर शाकाहारी होते. त्याचवेळी तो लोकशाहीवादी नेते असल्याचे गुंडुराव म्हणाले.

हे सुद्धा वाचा

महात्मा गांधी कट्टर शाकाहारी

ब्राह्मण असले तरी सावरकर सार्वजनिक गोमांस खायचे. त्याचा प्रचार करायचे, असा गुंडुराव म्हणाले. त्यांनी भाषणात महात्मा गांधी आणि पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद जिना यांचा उल्लेख केला. गांधी हे हिंदू सांस्कृतिक रुढीवादाचे मूर्तिमंत उदाहरण होते. पण ते कट्टर शाकाहारी होते. त्याचवेळी तो लोकशाहीवादी नेते असल्याचे गुंडुराव म्हणाले. तर मोहम्मद जिना हे कधीच कट्टरपंथी नव्हते. पण सावरकर कट्टर होते. काही लोकांचा असा पण दावा आहे की जिना निषेध मानलेल्या डुकराचे मास चवीने खायचे. पण नंतर ते मुस्लिमांचे हिरो ठरले, असा सूर पण गुंडुराव यांनी आवळला.

गोडसेची पाळमुळं घट्ट होत आहेत

देशात गोडसेच्या कट्टरवादी विचाराची पाळमुळं घट्ट होत असल्याचा दावा दिनेश गुंडुराव यांनी केला. याच विचाराने महात्मा गांधी यांची हत्या केली. गांधीजी एक धार्मिक व्यक्ती होते. आता हा कट्टरतावाद फोफावत आहेत. गोरक्षकांच्या नावाखाली कुणाला पण मारहाण करण्यात येते. त्यांना सावरकरांचे विचार माहिती नाहीत. सावरकरांच्या कट्टरतावादाचा सामना करण्यासाठी आजही गांधींजीचे विचार प्रेरक असल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले.

काँग्रेस खोटारडी-अनुराग ठाकुर

काँग्रेस खोटारडी असल्याचा पलटवार केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी केला. भाजपने गुंडुराव यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. भारत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान सहन करणार नाही, असे ठाकुर म्हणाले. त्यांच्याकडून काँग्रेसने अद्याप कोणताच बोध घेतला नाही. काँग्रेस स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करत नाही हे पुन्हा सिद्ध झाल्याचा दावा ठाकुर यांनी केला.