हैदराबाद : तेलंगणातील महबुबनगरमध्ये (Mahbubnagar) मोठी दुर्घटना टळली. सकाळी-सकाळी विद्यार्थ्यांना घेऊन स्कूलबस निघाली. पुलाच्या खाली पाणी भरले होते. बसचालकाला पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळं तो पाण्यातून बस काढण्याचा प्रयत्न करत होता. पुराच्या पाण्यात बस जाऊन बंद (bus off) पडली. बसच्या चारही बाजूला पाणी होते. त्यामुळं विद्यार्थ्यांनी भीती वाटली. त्यांची आरडाओरड सुरू झाली. शेजाऱ्यांनी हे सारं दृश्य पाहिलं. त्यानंतर ते विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी धाऊन आले. सुमारे चार फूट पाण्यातून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. पालकांना (Parents) माहिती होताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आपली मुलं सुरक्षित असल्याचं पाहून त्यांचा जीवात जीव आला.
#WATCH | Telangana: A school bus, carrying 30 students, was partially submerged in a flooded street in Mahbubnagar today. The students were rescued by the locals. The bus was later brought out of the spot. pic.twitter.com/7OOUm8as0v
हे सुद्धा वाचा— ANI (@ANI) July 8, 2022
तेलंगणातील महबुबनगरात शुक्रवारी मोठी दुर्घटना टळली. स्कूल बस पाण्यात बुडाली होती. ही बस पाण्यात फसली असताना सुमारे 30 विद्यार्थी या बसमध्ये फसले होते. बसमधून बाहेर कसं पडायचं असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. कारण चारही बाजूला सुमारे तीन-चार फूट पाणी होते. या पाण्यात विद्यार्थी बुडण्याची शक्यता होती. अशावेळी शेजारी धाऊन आले. त्यांनी एका-एका मुलाला बसमधून व पुरातून बाहेर काढले. त्यामुळं या विद्यार्थ्यांचे प्राण वाचले. या सुरक्षा मोहिमेचा व्हिडीओ समोर आलाय. पोलीस उपायुक्तांनी सांगितलं की, ही घटना सकाळी नऊ वाजताच्या सुमाराची आहे. 30 विद्यार्थी घेऊन जाणारी बस मानचनपल्ली व सिगूर गड्डा टांडा पुलाच्या खाली फसली.
स्कूल बस 30 विद्यार्थ्यांना घेऊन जात होती. तेलंगणातील महबुबनगर येथे पुराच्या पाण्यात ही स्कूलबस बुडाली. या विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. त्यानंतर बसलाही पुराच्या बाहेर काढण्यात आले. कमी पाणी आहे, असं समजून चालकानी स्कूल बस सुरू ठेवली. पुढं तीन-चार फूट पाण्यात स्कूलबस शिरल्याचं लक्षात येताच बस बंद केली. तोपर्यंत विद्यार्थी बसमधून बाहेर पडू शकत नव्हते. स्थानिकांच्या मदतीनं या मुलांना बाहेर काढण्यात आलं. सर्व मुलं सुरक्षित बाहेर काढण्यात आले. ट्रॅक्टरच्या मदतीनं स्कूलबसलाही बाहेर काढण्यात आलं.