नवी दिल्ली | 14 डिसेंबर 2023 : संसदेमध्ये बुधवारी झालेल्या घटनेचे तीव्र पडसाद आज सभागृहात उमटले. विरोधी पक्षांनी या घटनेवरून गोंधळ घातला. ज्या दोन तरुणांनी लोकसभा सभागृहात प्रवेश त्यांना खासदार प्रताप सिम्हा यांच्या विनंती अर्जावरून प्रवेश पास देण्यात आला. त्यामुळे खासदार प्रताप सिम्हा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी केली. विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काल जो प्रकार झाला तो दुर्देवी आहे. या प्रकरणी लोकसभा सचिवालयातील आठ जणांना निलंबित करण्यात आले अशी माहिती दिली. परंतु, विरोधकांनी खासदार प्रताप सिम्हा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत गोंधळ घातला. त्यामुळे लोकसभेतील एकूण 16 खासदारांना निलंबित करण्यात आले.
संसदेत झालेल्या हल्ला प्रकरणात एकीकडे आरोपींची कसून चौकशी सुरु आहे. तर, दुसरीकडे गुरुवारी संसदेत प्रवेशाची संपूर्ण प्रक्रिया बदलण्यात आली. लोकसभेचे कामकाज सुरु होताच विरोधकांनी या प्रश्नावरूण गोंधळ घातला. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत उत्तर दिले. पण, विरोधकांनी सुरक्षेमध्ये कुचराई केल्याबद्दल विरोधक भाजप खासदार प्रताप सिम्हा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.
संसदेत झालेल्या कालच्या घटनेसंदर्भात गुरुवारी I.N.D.I.A. आघाडीच्या पक्षांची बैठक झाली. काल संसदेत झालेल्या अत्यंत गंभीर आणि धोकादायक सुरक्षेबाबत गृहमंत्र्यांनी दोन्ही सभागृहात सविस्तर निवेदन द्यावे. त्यानंतर त्यावर चर्चा व्हावी. घुसखोरांना व्हिजिटर पास देणारे भाजप खासदार प्रताप सिम्हा यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशा मागण्या केल्या.
लोकसभा सभागृहात विरोधी पक्षांनी या मागण्या लावून धरल्या. परंतु, मोदी सरकारने या मागण्या मान्य करण्यास नकार दिला त्यामुळे झालेल्या गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज 11 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. पुन्हा कामकाजाला सुरवात होताच संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी गोंधळ घालणे आणि खुर्चीचा अपमान केल्याप्रकरणी विरोधी पक्षांच्या खासदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव आणला. तो अध्यक्षांच्या खुर्चीवर बसलेल्या भर्तृहरी महाताब यांनी मंजूर केला.
हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित दिवसांसाठी या खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. ही कारवाई सुरु असतानाही विरोधी पक्षाचे खासदार सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत होते. संसदेतून निलंबित करण्यात आलेल्या 15 खासदारांपैकी 9 काँग्रेसचे, 2 सीपीएम, 2 डीएमके आणि एक सीपीआय पक्षाचा आहे.
काँग्रेस खासदारांमध्ये टी एन प्रतापन, हिबी एडन, एस जोतिमणी, रम्या हरिदास आणि डीन कुरियाकोसे यांचा समावेश आहे. याशिवाय तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार डेरेक ओब्रायन यांनाही अधिवेशनाच्या उर्वरित दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे.