नवी दिल्ली : मोदी सरकार आपल्या दुसऱ्या पर्वातील तिसरा अर्थसंकल्प आज सादर करणार आहे. निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) सकाळी 11 वाजता (1 फेब्रुवारी) संसदेत अर्थसंकल्प सादर (budget presentatio) करतील. मात्र, या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेले शेतकरी आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. टिकरी बॉर्डरवर शेतकऱ्यांच्या आंदोलनात महिला आणि विद्यार्थीही सहभागी होणार आहेत. त्यामुळे आंदोलनाची तीव्रता पाहता अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. (security of Nirmala Sitharaman has been increased on occasion of budget presentation)
कोरोना महामारीमुळे उद्योग, रोजगार आदी क्षेत्रात देशाची पिछेहाट झालेली असताना आज केंद्र सरकार आपला तिसरा अर्थसंकल्प सादर करणार आहे. मात्र, अर्थसंकल्प सादर करत असताना मागील दोन महिन्यांपासून सुरु असलेले दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी आपले आंदोलन आणखी तीव्र करणार आहेत. ही बाब लक्षात घेता खबरदारी म्हणून गाजीपूर सीमेचा रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. मात्र, असे असले तरी दिल्लीच्या टीकरी सीमेवर शेतकऱ्यांच्या आंदोलनात आणखी महिला सहभागी होणार आहेत. या आंदोलनात विद्यार्थीदेखील उडी घेणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता एकीकडे देशाचा अर्थसंकल्प सादर होत असताना दुसरीकडे शेतकऱी आंदोलनात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. यामुळेच आंदोलनाची तीव्रता आणि संसदेत सादर होणारा अर्थसंकल्प या दोन्ही गोष्टी लक्षात घेता अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
संसदेत अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना सरकार पुन्हा एकदा भेटण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी केलेली तरतूद घेऊन सरकार शेतकऱ्यांना उद्या (2 फेब्रुवारी भेटण्याची शक्यता आहे. मात्र, उद्याच्या सरकार-शेतकरी यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
धक्कादायक! कार आणि लक्झरी बसची भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यूhttps://t.co/N9ROFw3wtd#ACCIDENT
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 1, 2021
संबंधित बातम्या :
(security of Nirmala Sitharaman has been increased on occasion of budget presentation)