हैदराबाद | 10 ऑगस्ट 2023 : नेहमीच निरनिराळ्या कारणांनी चर्चेत येणारी वंदेभारत एक्सप्रेस पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिच्यावर कोणी दगडफेक केलेली नाही. किंवा तिने गुरांना देखील उडविलेले नाही. यावेळी वेगळ्याच कारणाने वंदेभारत एक्सप्रेस चर्चेत आली आहे. यावेळी एका प्रवाशाने केलेल्या उपदव्यापाने वंदेभारत एक्सप्रेस चर्चेत आली आहे. काय नेमके केले या प्रवाशाने की त्याला अटक करावी लागली आहे. ते पाहूया…
वंदेभारत एक्सप्रेस या भारताच्या पहिल्या सेमी हायस्पीड आणि आरामदायी ट्रेनचा प्रवास सध्या चर्चेत आहे. देशातील विविध राज्यात तब्बल 25 वंदेभारत सुरु करण्यात आल्या आहेत. आंध्रप्रदेशातील तिरुपती ते सिकंदराबाद अशा धावणाऱ्या वंदेभारत एक्सप्रेसमध्ये विचित्र प्रकार घडला आहे. गुडुर येथून ही वंदेभारत एक्सप्रेस जात असताना आणि तिला तिच्या गंतव्य स्थानकात पोहचण्यास आठ तासांहून अधिक वेळ शिल्लक असताना एका प्रवाशाने केलेल्या गोंधळामुळे ट्रेनमध्ये आणीबाणी माजली.
वंदेभारत एक्सप्रेसमध्ये एका विनातिकीट प्रवाशाने शिरकाव करीत टीसीपासून वाचण्यासाठी त्याने स्वत:ला टॉयलेटमध्ये कोंडून तो लपून बसला. परंतू वंदेभारतमधून फुकटात प्रवास करण्याचा त्याचा प्लान त्याच्याच एका गोष्टीने उधळला गेला. या ट्रेनमध्ये फायर अलार्म असल्याचे माहीती नसलेल्या या प्रवाशाने त्याने टॉयलेटमध्ये सिगारेट पेटविली आणि फायर अलार्मवाजू लागला. त्यामुळे प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरली. अग्निशमन यंत्रणा स्वयंचलितपणे कार्यरत झाली आणि कमार्टमेंटमध्ये पाण्याचे फवारे उडू लागले. त्यामुळे प्रवाशांनी घाबरुन ट्रेनच्या टॉकबॅक यंत्रणेद्वारे ट्रेनच्या गार्डशी संपर्क साधला.
या संदर्भात शेअर झालेल्या व्हिडीओत कोचमध्ये एअरोसोल पार्टीकल हवेत उडाल्याने धुरकट दिसत आहेत, त्यामुळे घाबरलेले प्रवासी दिसत आहेत. येथे व्हिडीओ पाहा…
Smoke engulfed Tirupati-Secunderabad #VandeBharatExpress in #AndhraPradesh, after a passenger lit up a cigarette in the toilet & plastic material caught fire from sidesteeam Smoke from the lighted end of a cigarette.
The train was stopped at Manubolu and passenger arrested. pic.twitter.com/YKZo6Xx94K
— Deccan Chronicle (@DeccanChronicle) August 9, 2023
त्याच दरम्यान ट्रेन मनुबुलु या स्थानकात थांबविण्यात आली. रेल्वे पोलिसांनी त्वरीत हालचाली करीत अग्निशमन उपकरणासह धाव घेतली आणि टॉयलेटचे दरवाजे तोडले तर आत प्रवासी सापडला. त्यानंतर नेल्लोरे येथे या प्रवाशाला पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्याची पुढील चौकशी सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे एका प्रवाशांच्या बेशिस्तीचा संपूर्ण रेल्वे यंत्रणेसह प्रवाशांना त्रास झाला असून वंदेभारतमध्ये सुरक्षा असताना हा प्रवासी विनातिकीट कसा काय चढला याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.
एक अनधिकृत प्रवाशाने तिरुपतीहून सुटलेल्या वंदेभारत एक्सप्रेसच्या C – 13 कोचमध्ये प्रवेश करीत स्वत: ला टॉयलेटमध्ये कोंडून घेतले. त्याने टॉयलेटमध्ये सिगारेट पेटविल्याने टॉयलेटमधील फायर अलार्म आणि आग विझविणारी यंत्रणा स्वयंचलितपणे कार्यरत झाली. असे दक्षिण मध्ये रेल्वे ( SCR ) झोन विजयवाडा डीव्हीजनच्या एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.