गुजरात : होळी हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. रंगांचा सण अशी ख्याती असलेल्या या सणानिमित्त विविध भागात होळीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. याचवेळी गुजरातमधील गांधीनगर भागातून एक मोठी बातमी समोर आली आहे. होळी दहन करताना येथील लोकांनी केलेले एक अनोखे आणि थक्क करणारे दृश्य समोर आले आहे. यावेळी होळी दहन करण्यात आले. होळी दहनाआधी लोकांनी होलिकेची पूजा करून नंतर तिला प्रदक्षिणा घातली. होळी पेटविली गेली आणि त्यानंतर तप्त लाल निखाऱ्यांचे राखेमध्ये रूपांतर होईपर्यंत तेथील लोकांनी अनवाणी पायाने त्या निखाऱ्यांवर चालत राहिले.
गुजरातमधील सूरत ओलपाडमध्ये होळी दहन उत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात आजूबाजूच्या गावातील हजारो लोक सहभागी झालेले. होळी उभी केली. साग्रसंगीत पूजा करुन लोकांनी प्रदक्षिणा घातली. पुन्हा पूजा करून होळी दहन करण्यात आले.
होळीच्या पेट घेतला. पहाता पहाता आगीच्या ज्वाला आणि धुराने वातावरण तापले. लाकडाचे निखारे पडू लागले आणि लोकांनी त्या लाल लाल निखाऱ्यावर अनवाणी पायांनी चालायला सुरवात केली. बाहेरच्या लोकांसाठी हे दृश्य आश्चर्यचकित करणारे होते.
होळी दहनातील तापलेल्या त्या लाल निखाऱ्यांचे राखेमध्ये रूपांतर होईपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहिली. होळी दहनाचा कार्यक्रम येथे दरवर्षी मोठ्या आनंदाने आणि उत्साहात साजरा करण्यात येतो. अनेक वर्ष होळी दहनानंतर गरम निखाऱ्यांवर अनवाणी चालण्याची ही प्रथा परंपरा येथे सुरु आहे.
प्राचीन कथेनुसार असुर राजाची बहीण होलिका हिला भगवान शिवाकडून अशी चादर मिळाली होती, जी अग्नीने जाळली जाऊ शकत नव्हती. होलिका ही भक्त प्रल्हाद याची आत्या. अनेक उपाय करूनही जेव्हा हिरण्यकशिपू भक्त प्रल्हादचा वध करू शकला नाही. तेव्हा हिरण्यकशिपू याच्या आज्ञेवरून होलिका बाल प्रल्हादला मारण्यासाठी चितेवर बसली. त्यावेळी होलिकाने ती चादर अंगावर घेतली होती. पण, ती चादर प्रल्हादच्या अंगावर पडली. त्यामुळे प्रल्हादचा जीव वाचला तर होलिकेचे दहन झाली.