मुंबई : सीमा हैदर देशातील प्रत्येकाला माहित झाली असावी, प्रेमासाठी तिने तिचा देश सोडत मुलाबाळांना घेऊन भारतामध्ये आली. मात्र सीमा हैदर ही गुप्तहेर असल्याचा संशयातून तिची चौकशी झाली. चौकशीमध्ये तिच्याविरोधात काहीच पुरावे लागले नाहीत. परंतु सर्व देशभरात सीमा हैदरबाबत चर्चा झाली. अशातच सीमावर चित्रपट येणार आहे, ही माहिती तिच्या पाकिस्तानमधील पतील समजताच त्याने तिची टिंगल उडवली आहे. त्यासोबतच त्याने हे सर्व राजकारणासाठी केलं जात असल्याचं म्हणत नेते अमित जानी यांच्यावर टीका केलीये.
सीमा हैदरवर चित्रपटण काढणाऱ्या अमित जानी यांना लाज वाटली पाहिजे. कारण ते कोणाचंं तरी वैयक्तिक आयुष्य पडद्यावर आणत आहेत. हे सर्व काही राजकारणासाठी केलं जात आहे. तुम्हाला चित्रपट बनवायचा असेल तर चांगल्या विषयांवर करा. मला सचिन-सीमाचं लग्न मान्य नाही. एखादी महिला घटस्फोट न घेता बाहेरच्या पूरूषासोबत रहत असेल तर त्याला काय म्हणायचं.
तुम्ही सीमाचा तोडं पाहिलं आहे का? ती अभिनेत्री होण्यासाठी पात्र नाही. जशी सीमा आहे तसाच तो दिग्दर्शकही असल्याचं गुलाब हैदर म्हणाला. अमित जानी याने कराची टू नोएडा असा चित्रपट बनवणार असल्याची घोषणा केली होती. मात्र या घोषणेनंतर त्यांना अनेक धमकीची फोन आले.
3 मे 2023 रोजी सीमा हैदर नेपाळ सीमेवरून ग्रेटर नोएडाला पोहोचली होती. सचिन मीनासोबत सुमारे दीड महिना राबुपुरा येथे राहिल्यानंतर 1 जुलै 2023 रोजी सकाळी सीमा आणि सचिन राबुपुरा येथून पळून मथुरा येथे पोहोचले. तिथे दुसऱ्या दिवशी त्यांना नोएडा पोलिसांनी अटक केली. दोघांना कोर्टात हजर करण्यात आलं. त्यांची चौकशी झाली सून आता ते जामीनावर बाहेर आले आहेत.
सचिन आणि सीमा यांची भेच PUBG गेमवर झाली होती. यानंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर सीमाने पाकिस्तान सोडून भारतात येण्याचा निर्णय घेतला. सचिन आणि सीमा दोघे नेपाळला पोहोचले आणि लग्न केलं. सीमाने धर्मही बदलल्याची माहिती आहे. सीमा आपल्यासोबत मुलांना घेऊन आली असून सचिननेही त्यांना स्वीकारलं आहे.