नवी दिल्ली : रेल्वे, बसेस, स्थानक, सिग्नलवर टाळ्या वाजवून पैसे मागणारे तृतीयपंथी तुम्ही पाहिले असतील. अनेकदा काही लोक त्यांना पैसे देतात. तर काहीजण त्यांना पाहूनच नाक मुरडतात. पण आता हेच टाळ्या वाजवणारे हात तुमचं रक्षण करणार आहेत. छत्तीसगड पोलिस भरती परीक्षेचा निकाल सोमवारी लागला. या भरती प्रक्रियेत 13 तृतीयपंथीयांची पोलीस भरतीत निवड झाली आहे. या 13 जणांना 4 जिल्ह्यात कॉन्स्टेबल म्हणून भरती केल्याची माहिती छत्तीसगड पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.(Selection of 13 transgender people in Chhattisgarh Police)
‘छत्तीसगडमध्ये पार पडलेल्या भरती प्रक्रियेचा निकाल सोमवारी लागला. त्यात उत्तीर्ण झालेल्या प्रत्येकाचं मी अभिनंदन करतो. आम्ही प्रथमच ट्रान्सजेंडर लोकांना कॉन्स्टेबल म्हणून भरती केलं आहे आणि मी त्यांचं वैयक्तिक अभिनंदन करतो’, असं छत्तीसगडचे पोलीस महासंचालक डीएम अवस्थी यांनी सांगितलं. निवड झालेल्या 13 पैकी 9 जणांना रायपूर रेंजमधून भरती झाले होते आणि 20 जण परीक्षेला बसले होते.
आतापर्यंत भारतात फक्त 2 ट्रान्सजेंडर पोलीस भरती करण्यात आली होती. त्यातील एक तामिळनाडू तर एक राजस्थानमध्ये भरती झाला होता. बिहार सरकारनेही नुकताच ट्रान्सजेंडरनाही पोलीस दलात संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.
छत्तीसगड पोलीस दलात सप्टेंबर 2018 मध्ये 2 हजार 259 पदासांसाठी भरती जाहीर करण्यात आली होती. त्यात 48 हजार परीक्षार्थींनी या भरती परीक्षेत भाग घेतला होता. त्यानंतर 2019 मध्ये ही भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार भरती प्रक्रिया पुन्हा जाहीर करण्यात आली. या भरती प्रक्रियेतूनच 13 तृतीयपंथीयांची निवड झाली आहे. डी श्रवण, एसपी राजनंदगाव यांनी सांगितलं की, जिल्ह्यातून 3 तृतीयपंथीयांची जिल्हा पोलीस दलात निवड झाल्याची माहिती समोर आली आहे.
संबंधित बातम्या :
मोठी बातमी! पोलीस भरतीबाबतचा जीआर रद्द, मात्र भरती कायम, गृहविभागाचा मोठा निर्णय
Selection of 13 transgender people in Chhattisgarh Police