मुंबई : क्रूझ रेव्ह ड्रग्ज पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह इतर सात आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यावेळी कोर्टात आर्यन खान तसेच एनसीबीच्या वकिलांची खडाजंगी झाली. आर्यन खानच्या बाजूने अॅड मानेशिंदे यांनी बाजू मांडली. तर एनसीबीच्या बाजूने एएसजी अनिल सिंग यांनी युक्तिवाद केला. आर्यन खान, इतर सात आरोपी तसेच एनसीबीच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने वरिल निकाल दिला.
#Breaking: Aryan Khan and 7 other accused remanded to judicial custody in Cruise Ship Drug Case. #AryanKhan
— Live Law (@LiveLawIndia) October 7, 2021
मुंबईवरुन गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर सुरु असलेल्या रेव्ह पार्टीमध्ये आर्यन खानसह इतर सात जणांना अटक करण्यात आलं होतं. या प्रकरणाचा तपास सध्या एनसीबीकडून सुरु आहे. एनसीबीने आर्यन खानसह अरबाझ मर्चंट (आर्यनचा मित्र), मूनमून धमेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर, गोमित चोप्रा यांना अटक केलं होतं. या सर्व आरोपींची एनसीबी कोठडीचा कालावधी संपल्यामुळे त्यांना आज कोर्टात हजर करण्यात आलं होतं. यावेळी एएसजी अनिल सिंग यांनी एनसीबीची बाजू मांडली. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींचा एकमेकांशी संबंध आहे. ड्रग्ज तस्करीचे जाळे शोधण्यासाठी त्यांच्या कोठडीत वाढ करण्याची गरज आहे. सर्व आरोपींची येत्या 11 ऑक्टोबरपर्यंत कोठडी वाढवावी, अशी विनंती सिंग यांनी न्यायालयाकडे केली.
तर दुसरीकडे आर्यन खान यांची बाजू मानेशिंदे यांनी मांडली. त्यांनी आर्यन खान यांच्या कोठडीत वाढ करण्याची गरज नाही. आर्यनला जामीन मंजूर करण्यात यावा, अशी न्यायालयाला विनंती केली. या सुनावणीदरम्यान एनसीबीचे वकील तसेच आर्यन खान आणि इतर आरोपीची बाजू मांडणारे वकील यांच्यात चांगलीच खडाजंगी रंगली. दोन्ही बाजू ऐकूण घेतल्यानंतर न्यायालयाने सर्व आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानचे नाव आल्यानंतर संपूर्ण भारतात खळबळ उडाली होती. न्यायालयात हजर केल्यानंतर आर्यनला पहिल्यांदा एक दिवस आणि नंतर तीन दिवस असे एकूण चार दिवस कोठडी सुनावण्यात आली होती. आजही एनसीबीच्या वकिलांनी आर्यन खानसह इतर आरोपींच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. त्यानंतर न्यायालयाने आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
#UPDATE | Mumbai court sends Aryan Khan, Arbaz Merchant and 6 others to judicial custody for 14 days in drugs seizure at cruise ship
Court says the case will now be heard by special NDPS court https://t.co/8rqko8epsc
— ANI (@ANI) October 7, 2021
आर्यन खान तसेच इतर सात आरोपींना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तसेच यावेळी आर्यन खानसह इतर आरोपींना जामीन अर्ज करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच या अर्जावर उद्या सकाळी 11 वाजता सुनावणी घेतली जाईल. त्याचबरोबर यावेळी एनसीबीने आपली बाजू मांडण्याचेदेखील आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे आर्यन खानची आजची रात्र कोठडीतच जाणार असून उद्या सकळी अकरा वाजता कोर्टाकडून त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी घेतली जाईल. त्यामुळे आर्यन खानला जामीन मिळणार का ? हे उद्याच समजू शकेल.
Mumbai: Esplanade Magistrate court says it will hear the bail plea of Aryan Khan at 11 am tomorrow; asks NCB to file reply by then
— ANI (@ANI) October 7, 2021
इतर बातम्या :
कोण आहेत समीर वानखेडे ज्यांच्या रेडमध्ये शाहरुखच्या मुलासह बडे बडे सापडलेत?