लग्नानंतर आठ महिन्यांनी पती शहीद, जिथं पती झाले शहीद तिथंच पत्नीला मिळाली पोस्टिंग

| Updated on: Apr 30, 2023 | 7:15 PM

लेफ्टनंट रेखा सिंह यांचे पती नायक दीपक सिंह बिहार रेजिमेंटच्या १६ व्या बटालीयनमध्ये तैनात होते. दीपक सिंह २०२० मध्ये पूर्व लडाखच्या गलवा घाटीत चिनी सैनिकांशी झालेल्या हिंसाचारात शहीद झाले.

लग्नानंतर आठ महिन्यांनी पती शहीद, जिथं पती झाले शहीद तिथंच पत्नीला मिळाली पोस्टिंग
Follow us on

नवी दिल्ली : गलवा येथे भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये २०२० मध्ये हिंसाचार झाला. यात नायक दीपक सिंह शहीद झाले. आता अशी बातमी आली की, नायक दीपक सिंह यांची पत्नी रेखा सिंह या सैन्यात सहभागी झाल्यात. विशेष म्हणजे रेखा या लेफ्टनंट झाल्यात. रेखा सिंह यांनी पहिली पोस्टिंग पूर्व लडाखमधील एनएसीवर दिली आहे. लेफ्टनंट रेखा सिंह यांचे पती नायक दीपक सिंह बिहार रेजिमेंटच्या १६ व्या बटालीयनमध्ये तैनात होते. दीपक सिंह २०२० मध्ये पूर्व लडाखच्या गलवा घाटीत चिनी सैनिकांशी झालेल्या हिंसाचारात शहीद झाले.

एका वर्षाच्या प्रशिक्षणानंतर झाल्या अधिकारी

रेखा सिंह यांनी चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीमधून एक वर्षांचं प्रशिक्षण पूर्ण केलंय. त्यानंतर त्यांनी लेफ्टनंट पदावर नियुक्त करण्यात आलं. रेखी सिंह यांचे पती दीपक सिंह बिहार रेजीमेंटच्या १६ व्या बटालियनमध्ये तैनात होते. २०२० मध्ये पूर्व लडाखच्या गलवा घाटीत चिनी सैन्यांसोबत झालेल्या हिंसाचारात शहीद झाले. नायक दीपक सिंह यांना मरणोपरान्मत २०२१ ला वीर चक्र या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हे सुद्धा वाचा

लग्नानंतर आठ महिन्यांनी दीपक सिंह झाले शहीद

भारतीय सेनेने ट्वीट करून लिहीलं की, महिला कॅडेट रेखा सिंह या भारतीय सेनेत अधिकारी झाल्यात. रेखा सिंह या शहीद नायक दीपक सिंह यांच्या पत्नी आहेत. रेखा सिंह यांनी चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीत प्रशिक्षण घेतले.
दीपक सिंह २०१२ मध्ये सेनेत सहभागी झाले होते.

शहीद होण्याच्या ८ महिन्यांपूर्वी लग्न

बिहार रेजिमेंटच्या बतौर नर्सिंग स्टाफमध्ये तैनात होते. जानेवारी २०२० मध्ये त्यांची पोस्टिंग लडाखमध्ये झाली. त्यानंतर पाच महिन्यांची चिनी सैन्यांसोबत हिंसाचार झाला. यात नायक दीपक सिंह शहीद झाले. शहीद होण्याच्या आठ महिन्यांपूर्वी त्यांनी रेखा सिंह यांच्याशी लग्न केलं होतं. आता रेखा सिंह यांनी सैन्यात सहभागी होऊन मोठं उदाहरण समाजासमोर ठेवलंय.